शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

४७ वर्षांपासून उर्से गावाचा ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:19 IST

गेल्या 47 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरु ष व अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक गौरीत्सव, नवरात्रोत्सव ,गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य उर्सें गाव ह्या गावाने एक गांव एक गणपतीच्या माध्यमातून जनते समोर एक आदर्श उभा केला आहे.

गेल्या 47 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरु ष व अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक गौरीत्सव, नवरात्रोत्सव ,गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे ४७ वे वर्ष असून ह्या गावाची लोकसंख्या २५०० च्या आसपास आहे. गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे व खेळांचे आयोजन केले जाते.ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावाने जोपासला आहे.कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येउन सर्व उत्सव साजरे करतात.विशेष म्हणजे गावातील तरु ण एकत्र येऊन डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात, येथे बनविण्यात येणारा आरासही इको फ्रेंडली असतो, ह्या वर्षी बांबू, नारळीच्या पात्या, लाकडाचा भुसा, कापूस ह्या पासून नारळ तयार करून त्यात बाप्पाना विराजमान केलं आहे विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नसून सर्व आर्थिक बाब हि गावकरीच गोळा करतात. या गावाने एक आपले स्वत:चे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात . तर सर्व काम ही श्रमदनातून केली जातात.ह्या गावाची परंपरा अशी कि गणपती व गौरी विसर्जना नंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो व भगवंता वरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. ह्या मधून उरलेले पैसे गरजवंत गाव शेतकरयांना व्याजाने वाटप केले जातात .व पुढील वर्षी ह्याच पैश्यातून हे सण साजरे करतात. दर वर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात. ठिकाणी जुगार व नश्या यांना पूर्णपणे विरोध असतो व असे करणारास दंड आकारला जातो गांवकरीनी सामाजिक भावनेतून संघिटत व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश ह्या माध्यमातून उर्से गावाने जनतेला देण्याचा प्रयत्न केलाय.