शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शिक्षकांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:25 IST

महाराष्ट्रातील केवळ २२,५०० उच्च माध्यमिक शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको व सर्व कॉलेज

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : महाराष्ट्रातील केवळ २२,५०० उच्च माध्यमिक शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको व सर्व कॉलेज, शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले व याबाबतची लेखी निवेदने शासनापर्यत पोहविण्यासाठी त्यांच्या प्रती तहसिलदार, शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक संघटना समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व शिक्षक तसेच पदवीधर आमदार यांना देण्यात आली असल्याची माहिती राज्य अध्यक्ष प्रा़ टी़ एम़ नाईक यांनी दिली़विक्रमगड तालुक्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे श्रेणीनुसार वेतन गेली १८ वर्षे दिले गेले नसल्याने शिक्षकांनी आखलेले बजेट पुरते कोलमडून गेले आहे़ आज हातामध्ये पुरेसा पैसा नाही काम करुन घेतले जात आहे़ एवढया महिन्याचा पगार मिळत नसल्याने या शिक्षकांचे मासिक वेतनही दर महिन्याच्या होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहेत़ गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती असल्याने त्यांचे कौटुंबिक अर्थकारण कोलमडले आहे. पगार मिळत नसल्याने उसनवारी करुन घरखर्च भागवावा लागत आहेत़ आज उसनवारी करुन करुन डोक्यावर भला मोठा कर्जाचा डोंगर झाला आहे आणि आता कर्ज फेडू शकत नसल्याने दुसरे कर्ज देखील मिळकत नसल्याने आल हया शिक्षकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे़आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ १०० हून अधिक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे़ गेली १८ वर्षापासून २२५०० शिक्षकांना पगार मिळत नाही, जर या आंदोलनाची दखल घेवून आॅगस्टच्या पहिल्या आठवडयात प्रस्ताव सादर केले गेले नाही व हा प्रश्न सोडविला गेला नाही तर येत्या अधिवेशनाच्यावेळी शाळा कॉलेज बंद करुन आझाद मैदानावर येऊन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. -प्रा़ टी़ एम पाईक, राज्य अध्यक्ष