शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अनधिकृत बांधकामे तोडणारच; आयुक्तांचे आश्वासन

By admin | Updated: November 7, 2015 00:14 IST

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्धार मनपा आयुक्त सतीश लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. आपल्या कारकिर्दीत गैरप्रकारांवर बेशक

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्धार मनपा आयुक्त सतीश लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. आपल्या कारकिर्दीत गैरप्रकारांवर बेशक कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही मोहीम राबवताना माझ्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव येत नसल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोखंडे यांनी महानगरपालिका कार्यालय तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामे आपल्या रडारवर आणली. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांनी एक प्रकारे अधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे. विविध कामांचे ठेके घेतलेल्या ठेकेदारांच्या पार्श्वभूमीची पूर्ण माहिती घेऊन कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालवला. त्यांच्या या धडक मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या चाळमाफियांची पळापळ सुरू झाली आहे. महानगरपालिकेचे विस्कळीत झालेले कामकाज मी निश्चितपणे रुळांवर आणेन, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. नागरिकांचे काम ठरावीक मुदतीत केले जावे, याकडे माझा नेहमीच कल राहिला आहे. अनधिकृत बांधकामांना वीज व पाणी देणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून अशा कारवाईमुळे भविष्यात अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण येऊ शकेल, असे मला वाटते. ही कामे करताना मला वरिष्ठांचे व पदाधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे सहज शक्य होत आहे. (प्रतिनिधी)