शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिला अत्यवस्थ, इतरांचा धोका टळला

By admin | Updated: March 1, 2016 01:59 IST

पाणजू दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोन महिलांची प्रकृत्ती अद्याप चिंंताजनक आहे. इतरांच्या प्रकृतीचा धोका मात्र टळला आहे

वसई : पाणजू दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोन महिलांची प्रकृत्ती अद्याप चिंंताजनक आहे. इतरांच्या प्रकृतीचा धोका मात्र टळला आहे. अपघातग्रस्त बोट मालकाची चौकशी सुरु असली तरी दुर्घटनेप्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाणजू येथील एका लग्नासाठी वऱ्हाड घेऊन जाण्याच्या तयारीत असलेली बोट क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले गेल्याने नायगाव खाडीकिनारी कलंडून झालेल्या अपघातात रामचंद्र म्हात्रे यांचा मृत्यू झाला होता. तर २१ जण जखमी झाले होते. यातील नूतन घरत आणि गीता पाटील यांची प्रकृती अद्याप चिंंताजनक असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतरांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. एक वर्षांच्या फाल्गुनी पाटील हिच्याही प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. दरम्यान, अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्त बोट मालक दिलीप पाटील यांची चौकशी करण्यात आली. मात्र, याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त बोटीत बहुतांश महिला होत्या. अपघात झाल्यानंतर महिला पाण्यात आणि चिखलात पडल्याने त्यांच्या अंगावरील दागिने गायब झाले होते. आज सकाळपासून याठिकाणी दागिन्यांची शोधमोहिम हाती घेण्यात आली असता चिखल आणि पाण्यात काही प्रमाणात दागिने आढळून आले. म्हात्रे वसईतील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी शाळेत पालकांचा क्रीडा दिवस असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत ते शाळेत होते. त्यानंतर ते पाणजू येथे लग्नास जाण्यास निघाले असता ही दुर्घटना घडली. म्हात्रे यांचे नेत्रदान करावे अशी इच्छा त्यांच्या कुटुंबियांची होती. त्यांनी वसईतील देहमुक्ती चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. मात्र बुडून मृत्यू झालेला असल्यास अवयव दान करता येत नाही. अशी माहिती पुरुषोत्तम पवार यांनी दिली असल्याने त्यांचे नेत्रदान करता आले नाही. त्यांचा मुलगा हर्षद म्हात्रे याची २०२० साली टोकियोत होणा-या आॅलिंपिकसाठी निवड झाली आहे. पण मुलाचें हे यश पाहता येणार नसल्याची खंत त्यांचा कुटुंबियांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)