शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कासव, स्पीनर, व्हॉट्सअ‍ॅपच्या राख्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:31 IST

जीएसटीमुळे राख्यांचेही दर वाढतील या भीतीने यंदाच्या रक्षाबंधनासाठी पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात राख्या ठाण्याच्या बाजारात आल्या आहेत. कासव, स्पीनर, व्हॉटस अ‍ॅप अशा राख्यांनी यंदा वेगळेपण

प्रज्ञा म्हात्रे ।ठाणे : जीएसटीमुळे राख्यांचेही दर वाढतील या भीतीने यंदाच्या रक्षाबंधनासाठी पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात राख्या ठाण्याच्या बाजारात आल्या आहेत. कासव, स्पीनर, व्हॉटस अ‍ॅप अशा राख्यांनी यंदा वेगळेपण ंआणले असले तरी त्यापेक्षा फार वेगळी व्हरायटी यंदा पाहायला मिळत नाही. जीएसटीमुळे असेल पण यंदा दरात वाढही झालेली नाही आणि घटही झालेली नाही, असे दुकानमालकांनी सांगितले.रक्षाबंधनाचा सण आठवडाभरात येऊन ठेपला. त्यानिमित्त गेल्या आठवडाभरात नानारंगी राख्या बाजारात आल्या असल्या तरी या राख्यांमध्ये दरवर्षी दिसून येणारे नाविन्यपूर्ण प्रकार यंदा मोजकेच असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या या मताला दुकान मालकांनीही दुजोरा दिला आहे. जीएसटीच्या भीतीने यंदा जास्त राख्या विक्रीसाठी आणल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.परदेशात राख्या पाठवाव्या लागत असल्यामुळे महिनाभर आधीच राख्यांची खरेदी दुकानमालक करीत असतात. राख्यांवरही जीएसटी लागू होते की काय आणि किती याबाबत आम्ही गोंधळलो होतो म्हणून यंदा २० ते ३० टक्केच माल आणला आणि त्यातही फारसे नवे प्रकार नसल्याचे दुकान मालक सुशील गाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राख्यांवर जीएसटी नसल्याचे नंतर समजले. परंतु आता नवीन राख्या आणणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदा राख्यांचे दर वाढलेले नाहीत आणि कमीही झाले नाही असे विक्रेत्यांनी सांगितले. मोठ्यांसाठी कासवाची राखी, बच्चे कंपनीसाठी स्पीनर राखी आणि तरुणाईला आकर्षित करणारी व्हॉट्सअ‍ॅप राखी या नव्याने पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राख्यांमध्ये मीनाकारी, वुडनमध्ये कार्व्हिंग राखी- त्यात ओम, गणपती, जरदोसी, मोती, रुद्राक्ष, इव्हील आय, डायमण्ड, गोल्ड प्लेटेड अमेरिकन डायमण्डची राखी, सिल्व्हर प्लेटेड, गोल्ड प्लेटेड विथ चंदन, डायमण्डमध्ये ओमची राखी, ब्रेस्लेटमध्ये ओम, रुद्राक्ष राखी, क्रिस्टल रुद्राक्ष राखी या प्रकारांच्या राख्या बाजारात आल्या असून याची किंमत १० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत आहे.