शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पालघरमध्ये हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:52 IST

भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.

पालघर  - भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताने न्हालेल्या ध्वजाचे पूजन झाले.ब्रिटिशांविरोधात संपूर्ण देशभर ‘चले जाव’ आंदोलन धगधगत असताना १४ आॅगस्ट १९४२ रोजी पालघर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पालघर तालुक्यातील तारापूर, घिवली, वडराई, सातपाटी, शिरगाव, बोईसर, नवापूर, मनोरसह अनेक गावांमधून नागरिक आणि राष्ट्र सेवा दलाचे हजारो देशभक्त सदस्य सहभागी झाले होते. स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले स्वातंत्र्यसैनिक घोषणा देत पालघर तहसीलच्या दिशेने हळूहळू कूच करू लागले होते. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने वातावरण तंग होते, अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या या मोर्चावर इंग्रजांनी लाठीमार व गोळीबार सुरू केला. इंग्रज अधिकारी अल्मेडा यांच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात पालघर तालुक्यातील नांदगाव येथील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येथील काशिनाथभाई हरी पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तेवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानातून तरुणांनी स्फूर्ती घ्यावी यासाठी शहरात हुतात्मा स्तंभाची उभारणी करण्यात आली.या प्रसंगी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसह, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आ. अमित घोडा, जिप अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, नगराध्यक्षा उज्ज्वला काळे आदी उपस्थित होते.अभिवादनासाठी गर्दीया हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी १४ आॅगस्टला पालघर येथील हुतात्मा चौकात १२ वाजून ३९ मिनिटांनी शालेय विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येने एकत्र येतात.

टॅग्स :palgharपालघरIndependence Dayस्वातंत्र्य दिन