शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात समिती फिरकलीच नाही

By admin | Updated: April 23, 2017 03:56 IST

विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी

- सुरेश काटे,  तलासरी

विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परीसरातल्या समस्यांबाबत मोठ्या मेहनतीने गोळा केलेली माहिती यामुळे निरर्थक ठरली आहे. तसेच समितीच्या दौऱ्यामुळे येथील काही समस्या सुटतील ही जनतेची अपेक्षाही फोल ठरली आहे. पालघर जिल्हा दौरा २० एप्रिल २०१७ या रोजी पासून आयोजित करण्यात आला होता, या दौऱ्यादरम्यान पालघर जिल्ह्यातील तलासरी आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, विविध प्रश्न, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृह तसेच विविध योजनांच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा व त्रुटी, निकृष्ट कामांची पाहणी ही समिती करेल, अशी अपेक्षा जनता करीत होती. परंतु ती फोल ठरली. या समितीचे सदस्य आमदार पास्कल धनारे हे तलासरीतील असल्याने ते या समितीला तलासरीत आणून येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील या जनतेच्या अपेक्षेचाही भंग झाला आहे.आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आमदार वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, राजू तोडसाम, पास्कल धनारे, काशीराम पावरा, चंद्रकांत सोनवणे, संजय पुरम, डॉ.अशोक उइके, उपसचिव ना.रा.थिटे, ए.बी. रहाटे कक्ष अधिकारी इत्यादी दौऱ्यावर होते, मात्र या समितीने तलासरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागाकडे पाठ फिरवल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली, दौऱ्याचा शेवटचा दिवस असल्याने आणि समिती येणार असल्याचे समजल्याने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भेट देऊन आश्रमशाळा नवीन इमारतींचे बांधकाम, सब सेंटर, झाई नवीन पूल बांधकाम इत्यादीचा समितीने आढावा घेतला. त्यानंतर तलासरी भागात दौरा होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने अधिकारी आवश्यक माहिती घेऊन हजर होते मात्र तालुक्यातील अन्य भागात भेटी न देता सरळ निघून गेल्याने नागरिक नाराज तर तलासरी तालुक्याच्या काही भागाचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. जि.प. सदस्याचा सवाल- तलासरी आदिवासी भागात अनेक समस्या असतांना या भागाकडे समितीने पाठ फिरवल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. - तिने तलासरी डहाणूच्या आदिवासी भागात न येता फक्त किनारपट्ट्याची सफर करून कोणते मोठे असे उदिष्ट साध्य केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.