शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:15 IST

वेळीच स्वच्छता आवश्यक; अन्यथा पर्यटनावर परिणाम होण्याची भीती

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोसळणाºया मुसळधार पावसामुळे समुद्राला मोठी भरती येऊन जिल्ह्याच्या ११० किमी.च्या किनाºयावर प्लास्टिक वजा कचºयाचे तसेच डांबर गोळ्यांचे ढीग जमले आहेत. सुंदर आणि स्वच्छ म्हणून ओळखल्या जाणाºया या किनाºयावरची स्वच्छता वेळीच न झाल्यास पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त होत आहे.पालघर जिल्ह्याला वसई ते झाई - बोर्डी असा एकूण ११० किमी.चा समुद्र किनारा लाभला आहे. कळंब, रानगाव, अर्नाळा, कोरे, केळवे, शिरगाव, सातपाटी, नांदगाव, वरोर, डहाणू, बोर्डी आदी किनारपट्टीवरील गावात मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय केला जातो. केळवे, बोर्डी या भागाला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती असल्याने लाखो पर्यटक वर्षभर या भागात येत असतात. परंतु, शनिवारी वर्षभरातील सर्वात मोठी भरती (५.८८ मीटर्सच्या लाटा) असल्याने आणि त्यातच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याबरोबर वाहत आलेला कचरा ओहोटी लागल्यानंतर कळंब, रानगाव, अर्नाळा, केळवे, शिरगाव, सातपाटीच्या किनाºयावर आला आहे. समुद्रातील ओएनजीसीच्या तेल उत्खननामुळे आणि मोठ्या तेलवाहू जहाजातून निघालेले तेल एकत्र येत त्याचे डांबर गोळे किनाºयावर लागले असून प्लास्टिक पिशव्यांचा मोठा खचही किनाºयावर दिसतो आहे. शनिवार-रविवारी जिल्ह्यात फिरायला आलेल्या पर्यटकांची या कचºयामुळे निराशा झाल्याचे दिसले. पर्यटन वाढीसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असताना कचरा साफ करणे गरजेचे बनले आहे.जिल्ह्यातील सरावली, सातपाटी, शिरगाव, केळवे आदी अनेक भागातील कचरा उचलून तो किनाºया लगतच टाकला जात असल्याने तो पुन्हा पावसाच्या पाण्याने वहात समुद्राला जाऊन मिळतो. ग्रामपंचायतीने याची काळजी घेत समुद्रापासून लांब आपले स्वत:चे डम्पिंग ग्राउंड बनवणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे पालघर नगर परिषदेकडून पूर्ण पालघर शहराचा, बिडको आदी औद्योगिक क्षेत्रातील कचरा वाहत पानेरी खाडीमार्गे समुद्राला मिळत असल्याने सर्व किनारे कचºयाने विद्रूप झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.आपले सुंदर किनारे टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून प्लास्टिक बंदी आणि रासायनिक सांडपाण्यावर निर्बंध घालण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे.- प्रल्हाद उर्फ बाबा कदम, सदस्य पर्यावरण नियंत्रण समिती, पालघर