शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

वसईत एसटी की परिवहन सेवा ?

By admin | Updated: March 20, 2017 01:53 IST

१ एप्रिलपासून एसटी महामंडळ वसईतील शहरी सेवा पूर्णपणे बंद करणार असून जागा मिळाली तरच महापालिका परिवहनच्या बसेस सुरु

वसई : १ एप्रिलपासून एसटी महामंडळ वसईतील शहरी सेवा पूर्णपणे बंद करणार असून जागा मिळाली तरच महापालिका परिवहनच्या बसेस सुरु करणार आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार एसटी महामंडळ वसई आणि नालासोपारा आगारातून सुटणाऱ्या शहरी बसेस बंद करणार आहे. तसे अखेरचे पत्र महामंडळाने महापालिकेला दिले आहे. मात्र, महापालिकेने विरार, नालासोपारा, नवघर आणि वसई े येथील एसटी स्थानकाच्या जागा भाडेतत्वावर मिळाल्या तरच बसेस सुरु करू असा, पवित्रा घेतला आहे. एसटी आणि महापालिका अधिकाऱ्यांची त्यासंदर्भात पहिली बैठक शनिवारी पार पडली. एसटीने सकारात्मक पावले उचलली आहेत. मात्र सोमवारी एसटीचे अधिकारी वसईत जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. जागा देण्यासंबंधीचा निर्णय सोमवारच्या भेटीनंतर एसटी महामंडळ घेणार आहे. त्यासाठी मंगळवारी दुसरी बैठक होणार आहे. त्यात महामंडळाने जागा देण्यास नकार दिला तर मात्र महापालिका बसेस सुरु न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान, एसटीच्या निर्णयाविरोधात जनआंदोलनाच्या नेत्या डॉमणिका डाबरे आणि सातवीत शिकणाऱ्या शारियन डाबरे या विद्यार्थ्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. वसईतील शेकडो विद्यार्थ्यांना सहा सात किलोमीटरचा प्रवास करून शाळेत जावे लागते आहे. त्यामुळे त्या बंद करण्यात येऊ नये अशी मागणी शारियनने केली आहे. तर वसईतील हजारो महिला पहाटे चार वाजल्यापासून घराबाहेर पडतात. इतक्या पहाटे फक्त एसटीच सुविधा देत आहे. एसटीच्या २५ मार्गावर दिवसाला ६२२ फेऱ्या होतात. स्वस्त, सुरक्षित आणि हमखास वाहतुकीचे साधन म्हणून एसटीला पर्याय नाही. त्यामुळे तिची शहर बससेवा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी डॉमणिका डाबरे यांनी केली आहे. (वार्ताहर)