शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अंगठ्यामुळे वाढणार कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 23:20 IST

मोफत धान्यासाठीची ई-पॉस यंत्रणा : वापर चुकीचा असल्याचे दुकानदारांचे मत

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्य शिधावाटप दुकानांतून करण्यात येत आहे. सध्याचा कोरोनाचा कहर पाहता ई-पॉसवर अंगठा घेऊन अन्नधान्य वाटप करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांना याचा धोका निर्माण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहेत. जिल्ह्यातील एकूण साडेबारा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. वसई शहरात शनिवारपासून या अन्नधान्य वाटपाला प्रारंभ झाला आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूरवर्गापुढील समस्या गंभीर बनल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. तसेच ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. वसई तालुक्यात कोरोना लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असताना आता धान्यासाठी अंगठा वापरणे हे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरेल, असे मत दुकानदारांनी व्यक्त केले.

सामाजिक अंतर राखणे दुकानदारांना अशक्य nदुकानात येणाऱ्या नागरिकांना मास्क, सामाजिक अंतर याचे पालन करणे गरजेचे असून सॅनिटायझर होणे गरजेचे आहे. तरच धोका कमी होऊ शकणार आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा देऊन धान्य घ्यावे लावत असल्याने हे आमच्यासाठी धोक्याचे आहे. nअनेकदा ग्राहकांचा अंगठा हातात धरून तो मशीनवर ठेवावा लागतो. त्यामुळे सामाजिक अंतर पाळता येत नाही. काही मास्क न घालताच धान्य घेण्यासाठी येतात. अशा वेळी कोरोनाचा संसर्गाची शक्यता आहे. तर सॅनिटायझर प्रत्येकदा वापरणे परवडणारे नसल्याने प्रशासनाने याचा विचार करावा, असे रेशनिंग चालकांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई-पॉस मशीनवर अंगठा वापरण्यास दुकानदार यांनी विरोध केला आहे. यामुळे आता दुकानदार आपल्या अंगठ्याचा वापर करून शिधापत्रिकाधारकासमोर पावती देईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकाला अंगठा वापरता येणार नसल्याने कोरोना प्रादुर्भावाचा धोका कमी होणार आहे.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार