शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वसईत तिघांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:47 IST

गेल्या दोन दिवसांत वसईत तिघांचा बळी गेला आहे. तुंगारेश्वरच्या धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे एकाचा तलावात बुडून तर वालीव येथे

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : गेल्या दोन दिवसांत वसईत तिघांचा बळी गेला आहे. तुंगारेश्वरच्या धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे एकाचा तलावात बुडून तर वालीव येथे एकाचा शॉक लागून मृत्यू झाला.रविवारी दुपारी भांडुप येथे राहणारा प्रतीक पेडणेकर (२३) हा तरुण आपल्या मित्रांसह तुंगारेश्वर धबधब्यात फिरायला आला होता. सर्व जण दारू पिऊन धबधब्यात पोहण्यास उतरले. मात्र, प्रतीकला न घेताच सर्व मित्र रविवारी रात्री मुंबईला परतले होते. प्रतीकच्या घरच्यांनी विचारणा केली असता तो मध्येच आमच्यातून निघून गेल्याने आम्हाला वाटले तो घरी गेला असावा, असे उत्तर त्याच्या मित्रांनी दिले होते. त्यामुळे सोमवारी प्रतीकचे नातेवाईक त्याला शोधण्यासाठी तुंगारेश्वर येथे आले होते. पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यातून प्रतीकचा मृतदेह बाहेर काढला. दुसऱ्या घटनेत मुसळधार पावसामुळे विजेची वायर तुटून साचलेल्या पाण्यात पडल्याने शॉक लागून वालीव खैरापाडा येथे राहणारा मनोहर भास्कर (२५) याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. ही घटना वालीवच्या फणसपाडा येथे घडली. तर तिसऱ्या घटनेत मंगळवारी दुपारी नालासोपारा येथे राहणारा दत्तू जाधव (४५) यांचा टाकीपाडा येथील तलावात बुडून मृत्यू झाला. तलाव परिसरात फिरत असताना तोल जाऊन पडल्याने ते बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.