शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांवर हल्ला करणाऱ्या तीन तस्करांना अटक

By admin | Updated: September 26, 2016 17:36 IST

वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना विरार पोलिसांनी अटक केली

ऑनलाइन लोकमतवसई, दि. 26 - विरारजवळील जंगलात जून महिन्यात वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना विरार पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत दिसलेल्या टेम्पोच्या वर्णनावरून पोलिसांनी ही कारवाई केली. याआधी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. अद्याप 6 जण फरार आहेत.दहा जूनच्या पहाटे साडेचारच्या सुमारास हि घटना होती. तस्करांची टोळी जंगलात वृक्षतोडीसाठी आणि शिकारीसाठी येणार असल्याची माहिती वसई वनविभागाला मिळाली होती. तीन वनवरक्षकांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी जंगलात निघाले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास पाचरूखे जंगलात गस्त घालत असताना तस्करांच्या टोळींनी या पथकावर दगडांनी तुफान हल्ला चढविला. तस्करांनी वनरक्षकांना कोंडीत पकडून दगडांनी हल्ला चढवला. दहा ते बारा जणांचे तस्कर एका टेम्पोतून आले होते. हल्ले खोर त्यांनतर फरार झाले होते. या हल्ल्यात वन रक्षक एन.बी. दळवी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला 34 टाके पडून हात फ्रॅक्चर झाला होता. या हल्ल्यात इतर कर्मचार्‍यांनी आपला जीव कसाबसा वाचविला होता.विरार पोलिसांकडे तस्कर टेम्पोतून पळून जात असताना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज सापडले होते. त्या आधारे त्यांचा शोध सुरू होता. तस्करांची टोळी महामार्गावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून हा टेम्पो ताब्यात घेऊन बाळकृष्ण भावर , आसिब मुल्ला व लक्ष्मण गुलुम या तिघांना अटक केली. या टोळीतील दोन तस्करांना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीत टेम्पो दिसला असेल म्हणून या तस्करांनी टेम्पोची नंबर प्लेट बदलली होती तसेच टेम्पोचा रंग बदलला होता अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख यांनी दिली.