शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मोक्काचे तिन्ही आरोपी बेड्यांसह फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:27 IST

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सातीवली खिंडीत हा प्रकार घडला.

नालासोपारा : सराईत गुन्हेगार, जबरी चोरी, दरोडे याप्रकरणी मोक्का लागलेले तीन आरोपी सेल्वास पोलिसांच्या ताब्यातून मंगळवारी रात्री पोलिसांना धक्काबुक्की करून बेड्यांसह पळून गेल्याची घटना घडली आहे. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सातीवली खिंडीत हा प्रकार घडला. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करत पळून गेलेल्या तीन आरोपींची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करून कोणाला दिसल्यावर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.तलासरी येथे राहणारे आरोपी जयराम लाखमा दळवी (२१), गणेश उर्फ बोक लाखमा दळवी (२०) आणि मार्टिन राज्या माढा (३०) यांच्यावर दरोडे, चोरी असे अनेक गुन्हे दाखल झाल्याने मोक्का लावण्यात आला होता. हे तिघे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. सेल्वासा येथे दरोडा टाकल्याप्रकरणी तेथील पोलीस त्यांच्या मागावर होते आणि हे तिन्ही आरोपी मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा ताबा घेण्यासाठी आले. त्यांना सेल्वासा सत्र न्यायालयात हजर करून पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेत असताना हा प्रकार झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सातीवली ब्रिजपुढे १०० मी. आल्यावर अनंतराव खिंडीत जयराम याने उलटीचे सोंग केले आणि गणेश व मार्टिन यांनी लघुशंकेचा बहाणा केला. गाडीतून उतरल्यानंतर तिघांनी एकमेकांना इशारे करून पोलिसांना धक्काबुक्की केली आणि जंगलातील कायदेशीर रखवालीतून ते पळून गेले. सेल्वासा मुख्यालयातील पोलिसांनी वालीव ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीनही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळाले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एका आदिवासी महिलेला ते जंगलात भेटले. रस्ता कोणत्या दिशेला आहे याची विचारणा त्यांनी या महिलेला केली. ही माहिती वालीव पोलिसांना मिळाल्यावर ते त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, तोवर हे तीनही आरोपी सदर ठिकाणाहून पळून गेले होते.