शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात गुन्हेगारांवर तिसऱ्या डोळ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:32 IST

नालासोपारा पोलिसांनी त्यांच्या हद्दीमधील मुख्य नाक्यावर, गर्दीच्या ठिकाणी तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

नालासोपारा : पश्चिमेकडील नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर आता तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे. नालासोपारा पोलिसांनी त्यांच्या हद्दीमधील मुख्य नाक्यावर, गर्दीच्या ठिकाणी तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात जनतेच्या सुरक्षेसाठी व गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना म्हणून ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही संकल्पना नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आली आहे.शहरात सर्वप्रथम माजी नगरसेविका सुषमा दिवेकर यांच्याकडून देण्यात आलेले पाटणकर पार्क येथील चार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सिविक सेंटर येथे छाया विकमानी यांच्याकडून दुचाकी, चारचाकी गाड्यांचे नंबर प्लेट रीडिंग करणारे तीन सीसीटीव्ही कॅमेरे, एसटी डेपो वळणावर प्रकाश वझे व अगस्ती सावंत यांच्याकडून तीन कॅमेरे, लक्ष्मीबेन छेडा मार्ग येथे सरफराज हुसेन यांच्याकडून चार कॅमेरे, यशवंत गौरव रिक्षा स्टँडच्या येथे माजी नगरसेविका शुभांगी गायकवाड यांच्याकडून तीन कॅमेरे, रिद्धी विनायक हॉस्पिटल येथे डॉ. वेंकट गोयल यांच्याकडून तीन कॅमेरे, निळेगावातील माजी नगरसेवक किशोर पाटील यांच्याकडून वाघोबा मंदिर, तपस्या बिल्डिंग आणि गावदेवी मंदिर या तीन ठिकाणी एकूण आठ कॅमेरे लावले. नाळा गावातील डिसिल्वा नगर येथे राकेश मच्याडो यांच्याकडून तीन कॅमेरे असे एकूण ३० सीसीटीव्ही बसविण्यात आले. नालासोपाऱ्यात पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते आणि सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या उपस्थितीत हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार यापुढेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करत असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.