शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगत्वावर त्यांनी केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:40 IST

तालुका शंभर टक्के आदिवसी असला तरी कागदावर दिसणारी शिक्षणाची प्रगती प्रत्यक्ष पाहिली असता दिसत नाही. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य ठरल्याची आकडेवारी वारंवार पुढे येत असताना

हुसेन मेमन ।जव्हार : तालुका शंभर टक्के आदिवसी असला तरी कागदावर दिसणारी शिक्षणाची प्रगती प्रत्यक्ष पाहिली असता दिसत नाही. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य ठरल्याची आकडेवारी वारंवार पुढे येत असताना तब्बल १,२११ दिव्यांग विद्यार्थी परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षणाचे धडे गिरवत असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे या सर्वांना शिक्षणाच्या मुख्य नाळेशी जोडण्याचे काम केले आहे जि. प.चे सहायक शिक्षक मिलिंद कांबळे यांनी.तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६० हजार इतकी असून येथे शिक्षणा प्रसाराचा विषय आजही शासनासाठी तेवढा सोपा नाही. काबाड कष्ट करणाºया मजुरांची बिºहाडे बºयाचदा स्थलांतर करीत असतांना दिसतात. यामुळे अजुनही या भागामध्ये अशिक्षितपणा दिसून येतो. त्याकरीता जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत तालुक्यात १२ शासकीय आश्रम शाळा चालविल्या जातात, जि.प. अंतर्गत २४५ जिल्हा परिषद शाळा आहेत. तसेच पाच ठिकाणी खासगी व अभिमत शैक्षणिक संस्था असून, शहरात भारतीय विद्यापीठ व गोखले एज्युकेशन सोसायटीची शाळा व महाविद्याले आहेत.या शैक्षणिक संकुलांमध्ये १ हजार २११ दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित असून त्यांना जव्हार पंचायत समितीकडून शैक्षणिक साहित्य पुरविले जात आहे. या अपंग विद्यार्थांना सहकार्य करणारे सहाय्यक शिक्षक मिलिंद कांबळे हे तळागाळातील आदिवासी अपंग विद्यार्थांना सर्वतोपरी मद्दत करणारे शिक्षक ठरले आहेत. ही प्रशस्ती सरकारी नसून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मिळाली आहे हे विशेष.दिव्यांगानां शिक्षण घेतांना अनेक समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, सहायक शिक्षक कांबळे हे सतत त्यांच्या पालकांच्या संपकर् ात राहून विद्यार्थ्यांच्या हजेरी कडे, शैक्षणिक चढ उतारांकडे बारकाईने लक्ष ठेवत असतांना. शिवाय ते स्वत:ची ड्यूटी सांभाळून महिनाभरातून संबधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांना भेटून हालहवाल घेत असतात. अर्थातच या सक्रीयतेमुळे आज ते प्रत्येक पालकांना तसेच पालक त्यांना ओळखत आहेत.