शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बोईसर आगारात निवारा शेडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:08 IST

उन्हात बसून करावी लागते प्रतीक्षा; एस.टी. प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप

बोईसर : बोईसरहून पालघरला जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बोईसर एस.टी. आगारात बसची प्रतीक्षा उन्हातच करावी लागते आहे. येथे निवारा शेड असावी, या प्रवाशांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे एस.टी. प्रशासन गांभीर्याने पहात नसल्याने उन्हाळा तसेच पावसाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.बोईसर - पालघर दरम्यान दररोज अर्ध्या तासाच्या अंतराने चाळीस - चाळीस अशा बसेसच्या एकूण ८० फेºया होतात. यातून सुमारे तीन हजार प्रवासी ये-जा करीत असतात. बोईसर एस.टी. डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालघरकडे जाण्यासाठी बसेस थांबतात. परंतु तेथे निवारा शेड नसल्याने प्रवाशांना कधी उन्हात, कधी पावसात थांबावे लागते.पालघर हे तालुका आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्याने इतर कामाबरोबरच शासकीय कामासाठी बोईसरच्या नागरिकांना ये-जा करावी लागते. अशा महत्त्वाच्या थांब्यावर ऊन - पावसापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना निवाºयाची अत्यंत गरज आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे निवारा नसलेल्या या थांब्यापासून अगदी काही अंतरावर शेकडो प्रवासी तसेच नागरिक उघड्यावरच लघुशंका करीत असल्याने काहीवेळा दुर्गंधीलाही तोंड द्यावे लागते. अशा दुहेरी समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते आहे. एस.टी.महामंडळाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन, प्रवाशांच्या सेवेसाठी नागरिकांना वाहतूक सुविधा पुरवली आहे. त्यामधे बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रतीक्षालय अपेक्षित आहे. तेथे प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, खेळती हवा रहावी यासाठी पंखे, पिण्याचे पाणी या सुविधा त्याशिवाय प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करणे सुलभ व्हावे याकरिता स्वतंत्र फलाटाचीही व्यवस्था अनेक आगारात दिसते. परंतु बोईसर एस.टी. आगार उत्पन्नाच्या दृष्टीने मोठे असूनही येथे अशी दुरवस्था दिसत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.राज्य परिवहन पालघर विभागीय स्थापत्य अधिकाऱ्यांना निवारा संदर्भात पत्र पाठवण्यात येईल.- संदीप शिंदे, आगार व्यवस्थापक