शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरला एका कामगाराला वायूबाधा झाल्याचा संशय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:25 IST

आधीच आजारी असल्याचा दावा; कारखाना व्यवस्थापनाकडून घटनेचा इन्कार

बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यातील एका कंत्राटी कामगाराला बुधवारी सकाळी वायूबाधा झाल्याने त्याला भोवळ आली. मात्र, कारखाना व्यवस्थापनाने या घटनेचा इन्कार केला असून तो कामगार अगोदरच आजारी असल्याचे सांगितले. तर सदर कामगाराला एमआयडीसीतील तुंगा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.तारापूर येथील साळवी केमिकल्स या कारखान्यात ३ ते ४ महिन्यापासून कंत्राटी पद्धतीवर काम करणारा राहुल कुमार (२१) याला बुधवारी सकाळी कारखान्यात काम करीत असताना वायूचा वास आल्याने चक्कर आली. तो तेथेच बसला. नंतर गेटवर आला असता तो पडल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, त्या कारखान्यासमोरून जाणाऱ्या काही जणांना गेट बाहेर पडलेला कामगार दिसताच त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले.या संदर्भात कारखान्यातील मॅनेजर गिरी यांच्याशी संपर्क साधला असता हा कामगार चार - पाच दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे तो कामावर येत नव्हता. आजदेखील त्याला काम करू नको, असे सांगितल्यावरही तो कामाला लागला. मात्र, त्याच्या तब्ब्येतीला त्रास होऊ लागल्याने तो गेट पास घेऊन घरी जात होता. बोईसर पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत.