शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

तलासरी तालुक्यात मागेल त्याला रोजगार हमीचे काम; १२२ कामे सुरू, ६४७ मजुरांना राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:47 IST

वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरणामार्फत पाच कामे रोपवाटिका व वृक्षलागवडीची सुरू आहेत. त्यावर ११ मजूर कामाला आहेत. तलासरी पंचायत समितीमार्फत रोजगार हमीतून घरकुलांची सर्वाधिक १०४ कामे सुरू आहेत.

तलासरी : तलासरीत रोजगार हमीची कामे मोठ्या संख्येने सुरू असून प्रत्येक गावपाड्यांत मागेल त्याला रोजगार हमीचे काम तत्काळ दिले जात असून, एकूण यंत्रणेच्या १२२ कामांमध्ये ६४७ मजुरांच्या हाताला काम दिले असल्याने  लाॅकडाऊननंतर काम नसलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

रोजगार हमीच्या कामांमुळे या भागातून होणारे  स्थलांतर काही अंशी कमी झाले आहे. तलासरी तालुक्यात कृषी विभागामार्फत फळबाग लागवड, मजगी, जुनी भातशेती दुरुस्ती इत्यादींची सहा कामे सुरू असून १२५ मजूर काम करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची रोजगार हमीची रस्ते, मोरी, साकव अशा चार कामांवर १२४ मजूर कामाला आहेत. वनविभाग बोर्डीच्या अखत्यारीत रोपवाटिका, जलशोषक चर अशी दाेन कामे असून तेथे ४ मजूर कामावर आहेत. उधवा वन विभागामार्फत  फक्त एकच काम रोपवाटिकेचे सुरू आहे. त्यावर २८ मजूर काम करीत आहेत.

वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरणामार्फत पाच कामे रोपवाटिका व वृक्षलागवडीची सुरू आहेत. त्यावर ११ मजूर कामाला आहेत. तलासरी पंचायत समितीमार्फत रोजगार हमीतून घरकुलांची सर्वाधिक १०४ कामे सुरू आहेत. त्यावर ३५५ मजूर काम करीत आहेत.अशी एकूण १२२ कामे सुरू असून त्यामध्ये ६४७ मजुरांच्या हाताला काम देण्यात आले आहे. 

उद्दिष्टापेक्षा जास्त कामेतलासरी तालुक्याला एक लाख ९९० मजूर दिवस हे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण, तलासरी तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करून उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले. त्यांनी एक लाख ३८ हजार १७५ दिवस मजुरांना काम दिले. त्याची टक्केवारी १३५.४९ टक्के झाली. तलासरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. मागेल त्याला तत्काळ काम देण्यात येईल, असे तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांनी सांगितले