शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाबरोबर सुरुंगस्फोटानेही हादरतोय तलासरी तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:20 IST

उधवा-करजगावातील ग्रामस्थ हैराण : कारवाई कधी होणार?

सुरेश काटे 

तलासरी : तलासरी भागात वैधबरोबर अवैध खदानी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या खदानींमध्ये अवैधरीत्या सुरुंगाचे स्फोट करून मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन केले जाते. या वेळी केल्या जात असलेल्या स्फोटांमुळे आजूबाजूचा परिसर हादरत आहे. घरांना तडे जात आहेत. पाण्याची पातळीही खोल जात आहे. मात्र हे सुरुंग स्फोट काही थांबत नाही. आधीच सततच्या भूकंपांमुळे त्रस्त असलेले ग्रामस्थ खदानींमधील स्फोटांमुळे हैराण झालेले असून एखादी भीषण दुर्घटना घडल्यानंतरच शासकीय यंत्रणा कारवाई करणार का, असा प्रश्न स्थानिक विचारीत आहे.

तलासरी भाग सध्या निसर्गनिर्मित भूकंपांच्या धक्क्यांनी हादरत असून दुसरीकडे खदानीतही स्फोटांची मालिका सुरूच आहे. तलासरी भागात खदानींना सुरुंग स्फोट करून दगड उत्खनन करण्याची परवानगी नसल्याचे तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी स्पष्ट केले असताना खदानीत सुरुंगाचे स्फोट होतात कसे? महसूल विभागाचे मंडळ अधिकार, तलाठी गस्त घालत असताना या गोष्टी त्यांच्या निदर्शनात येत नाहीत का? असेही सवाल स्थानिक करीत आहेत.या खदानी मालकांच्या मनमानी सुरुंग स्फोटाचा फटका उधवा तसेच करजगाव येथील नागरिकांना बसत आहे. उधवा येथील खदानीमुळे सुरतीपाडा व कलमदेवी येथील नागरिक हैराण आहेत. कलमदेवी येथील ग्रामपंचायतीने याबाबतचा कारवाईसाठी ग्रामसभेचा ठरावही करून पाठवला. पण कारवाई शून्य, सुरतीपाड्यातील नागरिकांनी तलासरी तहसीलदारांना तक्रार अर्ज दिला आहे.महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने उधवा करजगावमधील खदानीमधील स्फोटांचे प्रमाण वाढले आहे. भूकंपामुळे घरांचे नुकसान होत आहे.स्फोटांमुळे डोकेदुखी झोपायचे तरी कुठे?खदानीत होणाऱ्या स्फोटांमुळे येथील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. घरात झोपावे तर भूकंपाची भीती अन् बाहेर बसावे तर खदानीतील दगडाची भीती सतावत आहे. त्यामुळे नागरिकांनी करावे तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. खदानीत स्फोट करणारे लोक राजस्थानातील असून स्फोट करण्याचे परवाने त्यांच्याकडे आहेत. पण तलासरीत स्फोटाची परवानगी नसताना मनमानी पद्धतीने खदानीत सुरु ंग स्फोट केलेजात आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार