वसई : नालासोपा-यात शाळेतील मुलांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्रिमूर्ती यादव (१४) असे मुलाचे नाव आहे.तो नालासोपाºयात संतोषभुवन येथील विद्या बालभारती स्कूल या शाळेत सातवीत शिकतो. याच वर्षी तो शाळेत नव्यानेच दाखल झाला होता. शाळेत त्याचा जेवणाचा डबा घेणे, पाण्याची बाटली हिसकाविणे, ग्रुपने त्याला मारहाण करणे हा प्रकार काही विद्यार्थ्यांकडून दीड महिन्यापासून सुरू होता. हा प्रकार पालकांनी शाळा प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण शाळेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.सोमवारी शाळेतून सायंकाळी घरी आल्यावर त्रिमूर्तीने घरातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मोठा भाऊ घरातच असल्याने, त्याने त्याला खाली उतरविले. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नालासोपा-यात शाळेतील मुलांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:56 IST