शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दलालांविरूध्द तहसीलदार सागर सरसावले

By admin | Updated: June 20, 2017 06:35 IST

पालघरच्या सेतू कार्यालयातून मिळणाऱ्या विविध दाखल्याच्या अर्जासोबत शपथपत्र जोडण्याचा आग्रह करून त्याद्वारे नागरिकांची लाखो रुपयांची लूट

हितेन नाईक। लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघरच्या सेतू कार्यालयातून मिळणाऱ्या विविध दाखल्याच्या अर्जासोबत शपथपत्र जोडण्याचा आग्रह करून त्याद्वारे नागरिकांची लाखो रुपयांची लूट करणाऱ्या काही दलालांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी दाखल्यांसाठी शपथपत्राची सक्ती करणाऱ्या विरोधात तहसील कार्यालयात तक्र ार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.१० वी १२ वी च्या निकाल जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक प्रवेश,विविध परीक्षा ई. साठी विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची धावपळ सुरू असून तालुक्यातील सर्व सेतू कार्यालये,महा ई सेवा केंद्राच्या समोर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. दाखल्या साठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तालुका तहसील कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील पालकांना दाखल्या सोबत १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर घेण्याचा आग्रह करून त्यावर मजकूर लिहिण्याचा वेगळा चार्ज लावून लूट करण्याचा प्रकार तहसील कार्यालयाच्या आसपास असणाऱ्या काही दलालांकडून होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारी विकास गजरे आणि तहसीलदार महेश सागर यांनी आपली स्वत:ची ओळख लपवून सेतू कार्यालयासमोर उभ्या असलेल्या पालका मधील चर्चेचा मागोवा घेतला असता त्यांच्या आपापसातील चर्चेअंती ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. राज्य आणि केंद्र शासनाने सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था ई. शासकीय संस्था मध्ये शपथपत्रा ऐवजी स्वंय घोषणापत्रे व प्रमाणपत्रे, कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती ऐवजी स्वंय साक्षांकित प्रती स्वीकृत करण्याचे आदेश दिले असतांनाही ग्रामीण भागातील गरीब, अशिक्षित लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही स्टॅम्प व्हेंडर अर्जासोबत स्टॅम्प पेपर घेण्या बाबत करीत असलेला आग्रह आणि त्यातून होणारी लूट थांबविण्याचा दृष्टीने माहितीदर्शक फलक त्यांनी तात्काळ सर्वत्र लावले. शपथपत्र जोडण्याबाबत कुणी सक्ती करीत असल्यास तहसीलच्या ०२५२५-२५४९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या प्रयत्नाबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त होते आहे.