शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जाचक निर्बंधांनी ताडी व्यवसाय बंद?

By admin | Updated: December 31, 2016 03:53 IST

तालुक्यातील ९४ गाव-पाडयात सप्टेंबर ते जुलै या हंगामामध्ये सद्या उत्तम थंडी पडल्याने प्रत्येक झाडातून सात ते आठ लिटर ताडी मिळत असल्याने व तिला २५ रुपये लिटरचाभाव

- राहुल वाडेकर,  विक्रमगडतालुक्यातील ९४ गाव-पाडयात सप्टेंबर ते जुलै या हंगामामध्ये सद्या उत्तम थंडी पडल्याने प्रत्येक झाडातून सात ते आठ लिटर ताडी मिळत असल्याने व तिला २५ रुपये लिटरचाभाव मिळत असल्याने भूमीपुत्रांना रोजगार लाभतो आहे. परंतु शासनाच्या जाचक निर्बंधामुळे तो धोक्यात सापडला आहे. दरवर्षी ताड व खजूराच्या झाडांपासून निघणारा नैसर्गिक रस म्हणजेच ताडी विक्री व्यवसाय केला जातो़ यातून येथील खेडया-पाडयातील तरुणांना रोजगार उपलब्ध होत असतो़ सध्या थंडीच्या मोसमामध्ये ताडीचा उतरा चांगला येत असल्याने रोज एका ताडाच्या झाडास जवळ जवळ सात ते आठ लिटर ताडी गळते.एक लिटर करीता २५ रुपये असा भाव आहे़ दरम्यान शासनाने या व्यवसायासाठी जाचक अटी व नियम लादल्याने या व्यवसायावर मर्यादा पडल्या आहेत़त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील बेकार तरुणांना जर का नविन टी़ डी़ आर प्रमाणे ताडी विक्री परवाना देण्याचे धोरण उत्पादन शुल्क खात्याने व महाराष्ट्र शासनाने ठरविले तर काही बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे याभागातील बेकारी दूर होण्यास मदतच होणार आहे़जिल्हयांच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर ताडी विक्री होत असते़ दारु व इतर विदेशी मदय, गावठी दारु यांपेक्षा ताडी पिण्यास पाण्याप्रमाणे व चवीस गोडी असलेली ताडी शरीरास थंडावा देते, तर माफक प्रमाणात ताडी सेवन केल्यास नैसर्गिक गुणधर्म असल्यसाने शरीरास उपाय कारक ठरत असते़ ताडीमुळे पोटांचे विकार दूर होतात तर मुतखडा पडण्यास मदत होते जरी या पेयामुळे नशा येत असली तरी ताडीमध्ये अनेक गुणधर्म आहे़ मात्र तिचे पिण्याचे प्रमाण मर्यादीत असले पाहीजे़ शासनाने ताडी विक्री व्यवसायाकारीता ठेवलेल्या जाचक अटी शिथील कराव्यात व सर्व ताडी विक्रेत्यांना कायदेशिररित्या परवाने दयावे याकरीता असलेली शासनाची फी भरण्यास आम्ही तयार आहोत़ त्यातून शासनास महसूल मिळेल व आम्हांस रोजगार उपलब्ध होईल़ यावर अनेकांचे पोट भरले जाते़. हे सरकारने विसरू नये.- नावजी तुंबडा, भंडारी आंबेघर गांव