शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या प्रकल्पाची मान्यता रद्द

By admin | Updated: April 20, 2017 03:56 IST

पाच वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही नगद वर्तमान मुल्याची रक्कम भरण्यासह आवश्यक बाबीची पूर्तता न केल्यामुळे राज्यातील तत्वत: मान्यता असलेल्या ताडोबा

पालघर/नंडोरे : पाच वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही नगद वर्तमान मुल्याची रक्कम भरण्यासह आवश्यक बाबीची पूर्तता न केल्यामुळे राज्यातील तत्वत: मान्यता असलेल्या ताडोबा, आंधारी व्याघ्रप्रकल्प, लालपेठ तर कोळसा खाण अशा प्रकल्पासह पालघर जिल्ह्यातील आदिवासी व शेतकर्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सुर्या प्रकल्पाची मान्यता केंद्रीय व वनमंत्रालयाने रद्द केली आहे.मान्यता रद्द केलेले असे १९ प्रकल्प याअंतर्गत आहेत. यामुळे अन्य प्रकल्पापुढे प्रश्न चिन्ह उभे राहिलेच आहे मात्र तत्वत: मान्यता मिळाल्यानंतरही जलसंपदा विभागाने पर्यायी वनीकरणासाठीची १३६ कोटीची रक्कम न भरल्यामुळे या प्रकल्पाची मान्यता रद्द होऊन सुमारे २२०६ हेक्टर म्हणजे ५५१५ एकर जमीन सिंचनातून बाद होणार आहे. याचा मोठा फटका प्रामुख्याने पालघर तालुक्यातील आदिवासी व प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे त्याच बरोबरीने या भागातील कालवे व तत्सम कामासाठी झालेला व आदिवासी उपयोजनेतून केलेला कोट्यावधीचा खर्च वाया जाणार आहे.केंद्रीय वनमंत्रालयाच्या अधिपत्याखालील वन सल्लागार समितीने महाराष्ट्र राज्याचे वन विभाग प्रधान सचिव यांना पत्राद्वारे कालवून याकडे लक्ष वेधले आहे. तसेच तत्वत: मान्यता रद्द केलेल्या या प्रकल्पाना आवश्यकता असली तर राज्याने हे प्रकल्प मान्यतेसाठी नव्याने अर्ज करावेत असेही समितीने सुचिवले आहे. पालघर जिल्ह्यातील सुर्या प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाला तात्विक मान्यतेसाठी वनविभागाकडे हा प्रश्न रेंगाळला होता. आदिवासींच्या व इथल्या शेतकरयांसाठी बदल घडवून आणणाऱ्या या प्रकल्पासाठीची रक्कम आदिवासी विकास विभागाने भरून या आदिवासी व शेतकरी बांधवाना दिलासा देणे गरजेचे होते इतकेच नव्हे तर अलीकडेच झालेल्या निवडणुकीतील भाजपा-सेना सत्ताधारी पक्षात जिल्ह्याचे पालक मंत्री व सरकारच्या मंत्रिमंडळात आदिवासी मंत्री म्हणून स्थान मिळवलेले विष्णू सवरा हे या प्रकल्पाची रक्कम भरतील व प्रकल्पाची मान्यता आणतील असे वाटत असताना स्वत:च्या जिल्ह्यातील आदिवासी व शेतकऱ्यांची उपेक्षा होते याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुर्या प्रकल्प हा सिंचनासाठीचा प्रकल्प असून वनविभागाची १४०० हेक्टर जमीन या प्रकल्पाअंतर्गत आली आहे. यासाठी नगद वर्तमान मुल्यासह पर्यायी जमीन तसेच पर्यायी जमिनीवर वनीकरणाची येणारा खर्च अनुक्र मे ९६ व १३६ कोटी वनविभागाकडे जमा करणे अपेक्षित होते. मात्र, जलसंपदा विभागाने या रकमेचा भरणा केला नाही व पुढे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नगद मुल्यापोटीची ९६ कोटीच्या रकमेचा भरणा केला. यातून वसई-विरार व मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाची बिगर सिंचनाकरीता सुमारे १८० दलघमीहून अधिक पाण्याचे आरक्षण मिळविले तरीही पर्यायी वनीकरणासाठीची १३६ कोटीची रक्कम जलसंपदा विभागाने वनविभागाकडे जमा केली नाही. त्यामुळेच अखेरीस केंद्राने सुर्या प्रकल्पाची तत्वत: मान्यता रद्द केली आहे. अर्थात या प्रकल्पात सरकारला यापुढे स्वारस्य असल्यास सरकारने नव्याने अर्ज सादर करावा असेही मंत्रालयाने सुचिवले आहे.