शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागेबाबत एसटीची भूमिका सकारात्मक

By admin | Updated: March 19, 2017 05:32 IST

वसईच्या अत्यंत जिव्हाळ््याच्या प्रश्नावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेला जागा मिळण्याची आशा निर्माण झाली

- शशी करपे,  वसईवसईच्या अत्यंत जिव्हाळ््याच्या प्रश्नावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेला जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून एसटीची सेवा बंद होऊन महापालिकेची परिवहन सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. एसटीने येत्या १ एप्रिलपासून नालासोपारा आणि वसई आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या शहरी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार त्यामार्गावर महापालिकेच्या परिवहन विभागाने बस सेवा सुरु करणे बंधनकारक आहे. मात्र, बस उभ्या करणे, प्रवाशी निवारा शेड बांधणे, बस स्टँड यासाठी जागा नसल्याने महापालिकेने एसटीकडून भाडेतत्वावर जागेची मागणी केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून मागणी करूनही एसटीच्या अधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेने जोपर्यंत भाडेतत्वावर जागा मिळत नाही तोपर्यंत एसटीच्या नालासोपारा आणि वसई आगारातून बंद होणाऱ्या २१ शहरी मार्गावर बस सेवा सुरु करण्यास नकार दिला आहे. मंगळवारी विरार येथे आलेल्या परिवहन मंत्र्यांनीही याबाबत ठोस निर्णय न घेता एसटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा असा सल्ला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला होता.शनिवारी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे, उपायुक्त किशोर गवस आणि परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक गोयल, महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांना मुंबई सेंट्रल येथे भेटून जागेसंदर्भात चर्चा केली. यावेळी विरार एसटी स्टँड, नालासोपारा एसटी स्टँड, नवघर एसटी स्टँड आणि वसई एसटी स्टँडमधील जागा भाडे तत्वावर द्यावी असा आग्रह महापालिकेच्यावतीने धरण्यात आला. याठिकाणी किमान दहा बसेस उभ्या राहू शकतील इतकी जागा मिळावी अशी मागणी केली. त्यावर गोयल यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना सोमवारी जागेवर जाऊन पाहणी अहवाल देण्याचे निर्देश दिले.