शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मूक मोर्चाचे काटेकोर नियोजन

By admin | Updated: October 22, 2016 03:27 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी सकल मराठा मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी आणि सकल मराठा पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी सकल मराठा मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी आणि सकल मराठा पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून करण्यात आले असून पार्किंग, आरोग्य, पाणी आदी महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पालघरमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या मोर्चांचे रेकॉर्डब्रेक करणारा हा मोर्चा असल्याने जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. या मोर्चासाठी गुजरात, वसई, विरार या भागातून ६० हजार दुचाकी व चारचाकी वाहने पालघरमध्ये वेगवेगळ्या मार्गावरुन येणार आहेत. या मोर्चासाठी शुक्रवारी जिल्हा प्रचार आणि प्रसार रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा तरुण उपस्थित होते. जिल्हा मोर्चा नियोजन समितीने बोईसरहून येणाऱ्या वाहनांसाठी प्रांत कार्यालयाजवळील दुग्ध प्रकल्प विभागाजवळील जागा, अग्निशमन केंद्राजवळील जागा, नंतर मनोरहून येणाऱ्यांसाठी सेंट जॉन कॉलेजजवळ, तर सफाळे मार्गावरून येणाऱ्यासाठी ट्विंकल स्टार शाळा समोर पार्किंग व्यवस्था केंद्र उभारण्यात आले आहेत.वैद्यकीय सुविधेसाठी पालघर रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय पालघर, आर्यन ग्राउंड व जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता येथे तात्पुरती प्राथमिक उपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा म्हणून ग्रामीण रु ग्णालय, पेट्रोलपंप, अशा ठिकाणी १२ रुग्णवाहिकांचा ताफा उभा असणार आहे. पालघरमधील खाजगी रु ग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. नैसर्गिक विधीसाठी फिरते शौचालय, पाणी, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीचे मार्ग निश्चितपालघर शहरातील मोर्चाच्या गर्दीचा आढावा घेत पालघर शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रविवारी पालघर शहरातून बोईसर आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टेम्भोडे, चाफेकर महाविद्यालय-खारेकुरण कल्याण नाका, थेट प्रांत कार्यालय, बोईसर मुख्य रस्ता, कोळगाव, पोलीस मैदान-जेनेसीस औद्योगिक वासहतीतून नंडोरे नाका, मनोर मुख्य रस्त्याकडे निघता येणार आहे. तसेच बोईसर बाजूकडून मुंबई कडे जाणारी वाहनेही या रस्त्याकडून वळविण्यात आली आहे. पालघर शहरात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून अवजड वाहनांना रविवारी बोईसर पालघर रस्ता, पालघर ते चार रस्ता, ते रेल्वे स्टेशन, चार रस्ता ते टेम्भोडे नाका, पालघर स्टेशन ते माहीम वळण नाका व हुतात्मा स्तंभ पालघर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी अवजड वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.