शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्यांचा माल घेऊन जाणारी पहाटेची लोकल सुरु करा; वसईकरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:19 IST

Local Train : वसई तालुका हा कृषी प्रधान असून तेथील शेतकरी आज ही भाजी, केळी, फुले यांचे उत्पादन घेत असून जोडधंदा म्हणून दुधाचाही व्यवसाय करीत आहेत.

वसई :-वसईतील भाजी उत्पादक, फूल उत्पादक, दूध उत्पादक वसईकर शेतकरी व त्यांचा माल मुंबईस पहाटेच्या वेळेस घेऊन जाणारी बंद झालेली लोकल ट्रेन पुन्हा तात्काळ सुरु करा अशी मागणी ग्राम स्वराज्य अभियान च्या वतीनं मिलिंद खानोलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वसई तालुका हा कृषी प्रधान असून तेथील शेतकरी आज ही भाजी, केळी, फुले यांचे उत्पादन घेत असून जोडधंदा म्हणून दुधाचाही व्यवसाय करीत आहेत.गेली  अनेक वर्षे सकाळी विरार स्थानकातून सुमारे पहाटे 3.30 च्या सुमारास सुटणारी पहिली लोकल हि त्या शेतकऱ्याना स्वत:ला व आपला माल मुंबईत विक्रीकरिता नेण्यासाठी अत्यंत सोयीची व उपलब्ध होती.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लोकलसेवा बंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी व  आज रोजी विशेषतः महिलांसाठी लोकल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि रेल्वे बोर्डाने घेतलेला आहे. त्या सेवा सुरू देखील आहेत.त्याचप्रमाणे नाशिवंत असलेला भाजीपाला, फुले, आणि दूध याची मुंबईस वाहतूक करून विक्री करू शकत नसल्याने वसईतील उत्पादकांवर आधीच आर्थिक संकट कोसळलेले आहे.

त्यांच्यासाठी असलेली सकाळी विरार स्थानकातून सुमारे पहाटे 3.30 च्या सुमारास सुटणारी पहिली लोकल सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आणि ती सुरु झाल्यास उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळेल.

एकूणच तसा निर्णय शासनाने तात्काळ घेऊन व त्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी घेऊन सदरहू लोकल लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती ग्राम स्वराज्य अभियानाच्या वतीने संस्थापक संयोजक मिलिंद खानोलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे देखील केली आहे.

टॅग्स :localलोकल