शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भात खरेदी केंद्रावरील कर्मचारी ‘लेट लतिफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:18 IST

नवीन कर्मचारी देण्याची मागणी; शेतकऱ्यांचा वेळ व पैसा जातो वाया

पारोळ : शिरवली भात खरेदी केंद्रावर ठेवण्यात आलेले कर्मचारी वेळेवर येत नसल्याने व काही भात खरेदी केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भात केंद्राबाहेर ठेवावे लागत आहे. यामुळे शेतकºयांचा वेळ व पैसा वाया जात असल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत असून खरेदी केंद्राला नवीन कर्मचारी द्यावा, अशी मागणी होत आहे.सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरले. या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने या वर्षी ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब आहे, मात्र महामंडळाकडे कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकरीवर्गाला भातविक्री करताना अडचण येत आहे. भात पीक घेणे हे आता शेतकरी यांच्यासाठी महागडे ठरत असून बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, टॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवत तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेत भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात जर व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटल मागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकरी वर्गाची मोठी पिळवणूक करतात. त्यामुळे वसईतील शेतकरी यांच्या भात विक्रीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात केंद्रांना सुरुवात करण्यात आली. शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.कर्मचारी एकचमहामंडळाकडे कर्मचारी कमी असल्याने या तीन ठिकाणची जबाबदारी एकाच कर्मचाºयावर देण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राला आठवड्याचा वार ठरवून ती करण्यात आली. पण एक दिवस खरेदी असल्याने शिरवली खरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाची गर्दी होत असल्याने सर्व शेतकरी यांची भात खरेदी होत नसल्याचे व मला रोज जव्हार वरून ये-जा करावी लागत असल्याने काही वेळा उशीर होत असल्याचे भात खरेदी केंद्र कर्मचारी इंगोले यांनी सांगितले.