शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा, वसई शहरातून एसटी बंद

By admin | Updated: March 18, 2017 03:00 IST

१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही

- शशी करपे,  वसई

१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, जागेसाठी आग्रही असलेल्या वसई विरार महापालिकेला एसटीकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने जागेसाठी अडून बसलेली महापालिका परिवहनच्या बसेस सोडणार की, नाही याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्य सरकारच्या धोरणानुसार एसटी महामंडळाने महापालिका हद्दीमधील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्नाळा आगारातील शहरी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर नालासोपारा आणि वसई आगारातील उरलेल्या २५ मार्गांवरील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेण्यात आला होता. मात्र, वसईकरांनी केलेले आंदोलन आणि वसई विरार महापालिकेने मुदत मागवून घेतल्यानंतर एसटीने ३१ मार्चपर्यंत एसटी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महापालिकेने एसटीने भाडे तत्वावर जागा द्यावी अशी मागणी केली आहे.परिवहनकडे स्वत:ची जागा नाही. स्टँड नाही. त्यामुळे प्रवाशांना सुविधा देणे अवघड होत आहे. एसटीने जागा भाड्याने दिल्यास परिवहनला बस सुरु करणे सोपे होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. जागा मिळत नाही तोपर्यंत महापालिका बस सेवा सुरु करणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात महापालिका आणि एसटी अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबैठकीत महापालिका जागेचा आग्रह धरणार आहे. या बैठकीत एसटीने जागा देण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मात्र, महापालिका बस सुरु करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हजारो प्रवाशांना जानेवारी महिन्यात एसटीने अचानक बस बंद केल्यानंतर चार दिवस जो त्रास सहन करावा लागला तसाच त्रास पुन्हा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एसटी बचाव आंदोलन समिती एसटीनेच बस सेवा कायम सुरु ठेवावी अशी पुन्हा मागणी केली आहे. महापालिका स्वत: बस चालवणार असेल तर हरकत नाही. पण, ठेका पद्धतीवर कंत्राटदार बस चालवणार असेल तर ग्रामीण भागातून त्याला विरोध केला जाईल, असा इशारा दिला आहे.परिवहनमंत्र्यांकडूनही स्पष्ट आदेश नाहीतगुरवारी परिवहन मंत्री दिवावकर रावते पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महापालिकेचे परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी महापालिक ा अधिकाऱ्यांसह त्यांची विरार येथे भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून मार्ग काढा असा सल्ला रावते यांनी दिला. रावते यांनी एसटीची शहरी वाहतूक वसई विरार महापालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. मात्र, महापालिकेच्या मागणी संदर्भात निर्णय दिला नाही. उलट एसटीच्या जागा महापालिकेला कशा देणार असा प्रतिसवाल रावते यांनी या बैठकीत उपस्थित केला होता. २४ मार्च रोजी सुनावणीवसईत एस.टी.सेवा सुरु ठेवण्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनआंदोलन समिती तर्फेडॉमनिका डाबरे यांच्या वतीने शुक्र वारी जनिहत याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात २४ मार्च रोजी पाहिली सुनावणी होणार असुन अँड रवी लोखंडे समितीच्या वतीने बाजू मांडणार आहेत.जागेची अडचण असल्याने परिवहन सेवेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एसटीने भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून नाही दिली तर बस सेवा सुरु करता येणार नाही. - भरत गुप्ता, सभापती, परिवहन समिती