शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात गणेशगीतांच्या सीडीची धूम

By admin | Updated: September 1, 2014 17:09 IST

गणेशगीतांच्या सीडींनी बाजारात धूम माजवली आहे. नव्या गायकांच्या नव्या दमाच्या गणेशगीतांच्या सीडी बाजारात उपलब्ध आहेत

ठाणे : गणेशगीतांच्या सीडींनी बाजारात धूम माजवली आहे. नव्या गायकांच्या नव्या दमाच्या गणेशगीतांच्या सीडी बाजारात उपलब्ध आहेत. मात्र लता मंगेशकर, प्रल्हाद शिंदे व सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाण्यांच्या सीडींना बाजारात मागणी आजही कायम आहे. नव्याची नवलाई काय आहे? मंगेश चव्हाण यांची पार्वतीच्या बाळा ही नवी सीडी बाजारात आली आहे. तिला चांगली मागणी आहे. याशिवाय ११७ नॉनस्टॉप गणपतीची गाणी, उदो बोला उदो माझ्या गणरायाचा, ढमाक ढम ढोल वाजे, गणपती बोले, मांडवात आला लालबागचा राजा, किसन नानाने नवस केला गणरायाचा, महाराष्ट्राची शान श्री महागणपती, लालबागच्या राजाचा विजय असो, सुखी ठेव गणराया आदी गाणी असलेल्या नव्या सीडी बाजारात आहेत. लालबागच्या राजा ही सीडी नवीन आली आहे. युनिव्हर्सल म्युझिकची स्वर गणेशा व व्ही.के. वैशंपायन शास्त्री यांनी सांगितलेली गणेशपूजेची सीडी बाजारात विकली जात आहे. या दोन्ही सीडींना गेल्या तीन वर्षांपासून चांगली मागणी आहे. मुहूर्त साधण्यासाठी भटजी मिळत नसल्याने प्रथम सीडी ऐकावी लागते. त्यानंतर, पूजेसाठी ती लावण्यात येते. मुहूर्त महत्त्वाचा असतो. भटजी मिळत नाहीत. त्यामुळे पूजेची सीडी लावून पूजा केली जाते. दादरचे सीडीविक्रेते सचिन कवळी यांनी सांगितले की, काही जणांना फास्ट ट्रॅक व काही जणांना स्लो ट्रॅकची गाणी आवडतात. डीजेचा क्लास कमी होत आहे. सीडीच्या किमतीत वाढ होत नाही. या सीडी १०० रुपयांना आहे. सीडी लवकर खराब होत नसल्याने वारंवार खरेदी केली जात नाही. बाजारात मालाला उठाव नाही. पावसामुळेही ग्राहक कमी होतात.स्मार्टफोनचा फटकाडोंबिवलीतील सीडीविक्रेते संजय जैन यांनी सांगितले, गणेशोत्सवात सीडी विक्रीची एक लाखाची उलाढाल होत होती. आता स्मार्टफोनमुळे मार्केट डाऊन आहे. अनेक लोक गाणी डाऊनलोड करतात. त्यामुळे या व्यवसायात थोडी मंदीची लाट आहे. चित्रपटगीतांच्या चालीवर बांधलेली गणेशगीते बाजारात आली आहेत. (प्रतिनिधी)