शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

साठ नवे वर्ग, नववीची समस्या सुटली लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:59 IST

या जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ६० वर्ग सुरु करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने शाळा सुरु होऊनही गेली दोन महिने शाळेबाहेर राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नववीतील प्रवेशाची समस्या सुटली आहे.

पालघर : या जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ६० वर्ग सुरु करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने शाळा सुरु होऊनही गेली दोन महिने शाळेबाहेर राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नववीतील प्रवेशाची समस्या सुटली आहे. जिल्ह्यातील ९ वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न एका बाजूने मार्गी लागत असताना स्वातंत्रोत्तर काळात जिल्हा परिषदेमार्फत नववीचे वर्ग प्रथमच सुरु होत असल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.पालघर जिल्ह्यात ८ वी उत्तीर्ण होऊन ९ वीत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त व शाळा त्यामानाने अपुºया पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे, जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी व शिक्षणाधिकाºयांनी गेल्या महिन्यात शिक्षणमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांच्या सांगण्यावरून जिल्हापरिषदेतील अशा शाळांचे प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर पाठविण्यात आले याचबरोबरीने या प्रश्नाचे गांभीर्य पाहता आदिवासी विकास विभागानेही यासंबंधीचे आपले प्रस्ताव पाठविले होते.मंत्रालयीन पातळीवर पालकमंत्री सवरा, आमदार धनारे, आमदार अमित घोडा यांच्यासह जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काल शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद शाळांना ९ वी व १० वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली.अशा वर्गाना मान्यता देणारा पालघर हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे.