शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोळाही नाक्यांवर सुरू राहणार १२ वर्षे टोल वसुली

By admin | Updated: December 13, 2015 00:08 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या व मुंबई महानगराचे प्रवेशव्दार असलेल्या ठाणे- पालघरमधील १६ही टोलनाके पुढील १२ वर्षे बंद होण्याची शक्यता नसल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री

- सुरेश लोखंडे,  ठाणेदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या व मुंबई महानगराचे प्रवेशव्दार असलेल्या ठाणे- पालघरमधील १६ही टोलनाके पुढील १२ वर्षे बंद होण्याची शक्यता नसल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जाहीर केल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. हे टोलनाके म्हणजे जिझिया कर असल्याची टीका करून जिल्हा नियोजन समितीचे कामकाज रोखून धरणाऱ्या आमदारांना यापुढील काळात कामही रोखता येत नाही आणि टोलला विरोधही करता येत नाही, अशा अवस्थेला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात सर्वात जास्त टोलनाके ठाणे जिल्ह्यात आहेत. ते बंद करण्यासाठी केलेले आंदोलन हा अविचार होता की काय, अशी भावना शिवसैनिकांत आहे. राज्यातील १२ टोलनाके ज्यावेळी बंद झालेत. त्यावेळी चार टोल नाक्यांवरील केवळ चारचाकी, दुचाकीसह बसचा टोल बंद झाला. पण त्या नाक्यांचा वापरच कमी प्रमाणात होत होता. या प्रश्नाचा पूर्ण अभ्यास न करता लोकप्रतिनिधींसह जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी स्वत:साठी टोलमाफीचा पास मिळवण्याचा आग्रह मात्र सतत धरला. राजकारण्यानी पासव्दारे टोल माफ करून घ्यायचा आणि जनतेला मात्र तो भरण्यास भाग पाडायचे, त्यासाठी दांडगाई करायची, अशी दुटप्पी भूमिका या काळात पाहायला मिळाली. ठाणे-पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद, आग्रा, बेंगळुरू व गोवा आदी चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. शिवाय चारही बाजूंनी हे जिल्हे राजमार्गांनी वेढलेले आहेत. अगदी कमी किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ््या यंत्रणांचे १६ टोल नाके जागोजाग उभे आहेत. तेथे आयआरबी, गॅमन इंडिया, सुप्री्रम इन्फ्रास्ट्रक्चर, डी. के. प्लस, केटी, संगम इंडिया, जयभारत, अ‍ॅटलांटा आदी खासगी कंपन्याकडून टोल वसूली सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्यमार्गावरील सुमार ३५ किलोमीटरच्या अंतरावर एक टोल नाका सुरू करण्याचे धोरण आहे. मात्र सरकारच्या या आदेशाची पायमल्ली करून कमी अंतरावर टोलनाके असल्याच्या तक्रारी आहेत. सोयीनुसार हे अंतर जुळवून आणले जाते. त्यामुळे टोलवसुली बिनबोभाट सुरू आहे आणि आता पुढील १२ वर्षे तो सुरू राहील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.