शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: February 19, 2016 02:18 IST

बोईसर एमआयडीसी मधील विनायक कंपनी समोरील विद्युत महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधून आॅइल चोरी करणाऱ्या चोरट्यांना अडविण्या

पालघर : बोईसर एमआयडीसी मधील विनायक कंपनी समोरील विद्युत महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधून आॅइल चोरी करणाऱ्या चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोईसर पोलिस स्टेशनच्या हेडकाँस्टेबलला मारहाण करुन त्याचे अपहरण केल्या प्रकरणी पालघरचे सत्र न्यायाधीश एम. एस क्षीरसागर यांनी ३ आरोपींना ६ वर्षाची सक्तमजूरी आणि ११ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.बोईसर एमआयडीसी औद्योगिक परिसरात महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून आॅइल चोरीच्या घटना मध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारीमुळे बोईसर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जयवंत बिडवई, के जी बोंड आणि विद्युत विभागाचे काटरेला लिंगारेड्डी इ. २८ नोव्हेंबर २०११ रोजी पहाटे २ वाजता एमआयडीसी परिसरात गस्त घालीत असताना २ ट्रक संशयास्पद अवस्थेत उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता ट्रक नादुरुस्त असल्याचे सांगितले. त्या नंतर पहाटे २.४५ वाजता जे जी प्लॉट सत्तर बंगला परिसरतून येत असताना पून: तेच ट्रक उभे असल्याचे पोलिस बिडवई याना आढळून आले. त्यानी आपल्या मोटर सायकलवरुन खाली उतरून पाहिले असता ट्रान्सफॉर्मर मधून पाइप पाईपद्वारे आॅइल चोरी सुरु असल्याचे पाहिले. त्यांनी चोरटयांना हटकले असता. त्यांनी आपल्या गाडीतील लोखंडी टॉमी ने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे सोबत असलेले लाईनमन रेड्डी मदतीसाठी आले असता चोरट्यांनी बिडवाई यांना दोरखंडाने बांधले आणि उचलून ट्रक मध्ये टाकून पळ काढला बिडवई यांनी मोठ्या प्रयत्नाने आपली सुटका करुन घेतली आणि मोबाइल वरुन वरिष्ठांशी संपर्क साधला. हा ट्रक वाड्यातील खण्डेश्वरी नाका येथे पोलिसांनी आडवला. त्यामुळे बिडवई यांची सुटका झाल्या नंतर ह्या प्रकरणी पोलिसांनी १) रघुवीर बजिरचंद राजपूत (२८वर्ष), २)सोमपाल मोतीलाल घोषि (२०वर्ष) ३)वीरेंद्र मुन्शीराम खेपरा (२४) सर्व राहणार नागपूर यांना पकडले. त्यांच्या अटकेनंतर या तेलाच्या चोऱ्यांना आळा बसला होता.