शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंविरोधात श्रमजीवी हायकोर्टात

By admin | Updated: May 9, 2017 00:22 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण, अंगांवाडी सेविकांचे प्रश्न आणि या पाशर््वभूमीवर श्रमजीवीने केलेल्या आंदोलनाला सीईओ चौधरींनी बदनाम केले.

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील कुपोषण, अंगांवाडी सेविकांचे प्रश्न आणि या पाशर््वभूमीवर श्रमजीवीने केलेल्या आंदोलनाला सीईओ चौधरींनी बदनाम केले. आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून सोशल मिडियावर संघटनेच्या कार्यकर्त्यांवर धादांत खोटे आरोप केल्याप्रकरणी संस्थापक विवेक पंडीत व श्रमजीवीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली असून याप्रकरणी दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जावे व संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बदनामीपोटी उचित अशी भरपाई मिळावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. ही माहिती विवेक पंडित यांनी येथील पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक संवादात दिली. लोकशाही मार्गाने रस्त्यावरची लढाई समर्थपणे सुरू असतांना श्रमजीवी आता स्वातंत्र्याचे मारेकरी बनू पाहणाऱ््या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहे. असे त्यांनी सांगितले. आम्ही लोकशाहीचे अनुयायी आहोत, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याने आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही ते म्हणाले. यात पंडित यांच्यासह ३७ आंदोलकांना भरपाई मिळावी अशीही याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २४ एप्रिल रोजी पालघर जिल्हा परिषदेवर श्रमजीवी संघटनेने आंदोलन केले होते. कुपोषित बालकांना मिळत असलेल्या नित्कृष्ट पोषण आहार बंद करावा आण िअंगवाडी सेविकांचे मानधन, पोषण आहाराची थकीत बिलं वेळेत तात्काळ अदा करावी या मागणीसाठी केलेल्या आंदोलना दरम्यान प्रश्नांना उत्तरे न देता निघून जात असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांची गाडी श्रमजीवी च्या कार्यकर्त्यांनी अडवली. याबाबत तब्बल २४ तासानंतर पंडित यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे चौधरी यांनी सोशल मीडियावर या आंदोलनाची तुलना सीताहरण आणि द्रौपदी वस्त्रहरणाशी केली होती. मात्र पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे काहीही नमूद केले नाही. मुळात असा कोणताही अनुचित प्रकार झाला नसतांना निधी चौधरी यांनी श्रमजीवी संघटनेची बदनामी होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. त्यानंतर जनतेला वेठीस धरून जिल्हापरिषद अधिकाऱ््यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. यानंतर विवेक पंडित यांच्यासह इतर २५ कार्यकर्ते आणि ११ महिला कार्यकर्त्यांनी जामीन नाकारून तुरु ंगवास पत्करला होता.यामुळे लोकशाही मार्गाने होणारे आंदोलनं चिरडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करून या अधिकाऱ्यांविरोधात श्रमजीवी संघटनेच्या सभासदांनी पालघर जिल्ह्यासह ठाणे, नाशिक, रायगड जिल्ह्यात आंदोलने केली. यानंतर विवेक पंडितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर चर्चेला आमंत्रित केल्याने पंडितांसह सर्व कार्यकर्त्यांनी जामीन स्वीकारला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याबतचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.