शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.स्वामी यांना कारणे दाखवा

By admin | Updated: February 15, 2017 23:35 IST

दांडी येथील निहार बोरसे या सहा वर्षीय बालकाला साप चावल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यावर डॉक्टर गैरहजर

हितेन नाईक / पालघरदांडी येथील निहार बोरसे या सहा वर्षीय बालकाला साप चावल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यावर डॉक्टर गैरहजर असल्याने ‘डॉक्टरांची दांडी, नर्स चा उपचारास नकार’ असे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्या नंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे यांनी डॉ. मोनिका स्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर स्थानिकांनी आरोग्यकेंद्राची स्थिती तात्काळ न बदलल्यास शुक्रवारी त्याला टाळे ठोकू असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.दांडी येथील निहार बोरसे या सहा वर्षीय बालकाला १४ फेब्रुवारी रोजी विषारी साप चावल्यानंतर दांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र आरोग्य केंद्रात नियुक्त डॉ.शिरीष ठाकरे हे प्रशिक्षणाला गेल्यामुळे नव्हते तर डॉ. मोनिका स्वामी याही उपस्थित नव्हत्या. नर्सने केवळ प्रथमोपचार केले व पुढील उपचार करण्यास नकार दिल्याने पालकांनी तात्काळ निहारला तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर डॉ.शिंदे यांनी त्वरित त्याच्यावर उपचार केल्यामुळेच त्याचे प्राण वाचले. गैरव्यवहार आणि वादग्रस्त कारवाया साठी दांडी प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख बनत असून राजकीय वरदहस्त डॉक्टरावर असल्याने गरीब रु ग्णावर उपचार करण्यास हयगय केली जात असल्याचा आरोप रुग्णामधून होत आहे. शासन परिपत्रकातील नियमानुसार दांडी आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष म्हणून भाजपच्या रंजना संखे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच भाजपाचे जि.प. कृषी सभापती अशोक वडे, भावना विचारे तर सेनेचे तुलसीदास तामोरे यांची सह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षपदावरून सेना-बीजेपी मध्ये मोठा वाद आहे. ह्या वादा मध्ये गरीब रुग्णांचे मोठे नुकसान होत असून रुग्ण कल्याण समितीचे कुठलेही नियंत्रण दांडी केंद्र आणि डॉक्टरांवर नसल्याने अनेक गैरबाबी दांडी केंद्रात घडत आहेत. प्रसूती साठी आलेल्या महिलाना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणे, सकाळी ११ वाजे पर्यंत आरोग्य केंद्रात न येणे आदी अनेक तक्रारी स्थानिकानी केल्या आहेत.