शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दापोली ग्रामपंचायतीसाठी भाजपावर सेनेचे ‘शिवबंधन’

By admin | Updated: June 17, 2017 01:04 IST

दापोली ग्रामपंचयातीवरील सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये सुरु असलेल्या लढाईत सध्यातरी सेनेने बाजी मारली आहे. सरपंच मनस्वी संखे ह्यांच्या

- लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : दापोली ग्रामपंचयातीवरील सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये सुरु असलेल्या लढाईत सध्यातरी सेनेने बाजी मारली आहे. सरपंच मनस्वी संखे ह्यांच्या हाताला जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी शिवबंधन बांधून ग्रामपंचायतींवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळविल्याचा दावा केला असला तरी सेना-भाजपच्या सरपंचाच्या पळवा-पळवीची खमंग चर्चा तालुक्यात सुरु आहे.पालघर तालुक्यात मे महिन्यात २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्या नंतर अनेक ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आल्याचा दावा अनेक पक्ष प्रमुखांनी केला होता. पालघर जवळील दापोली ग्रामपंचायत मध्ये एकूण ७ जागांपैकी बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा शिवसेना-भाजप करीत होते. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवाराकडे पक्षाचा एबी फॉर्म अथवा निवडणूक चिन्ह नसल्याने अनेक पक्ष उमेदवारांवर आपला दावा करीत होते. त्यामुळे दापोली ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी संखे ह्या शिवसेनेच्या असल्याचा दावा सेनेने केल्या नंतर भाजपच्या जेष्ठ पदाधिकारी अर्चना वाणी, जिप सभापती अशोक वडे, विजय तामोरे ई. पदाधिकाऱ्यांनी दापोली येथे धाव घेत सरपंच मनस्वी संखे ह्या आपल्या भाजप पक्षाच्या असल्याचा दावा करीत भाजप पक्षाचे झेंडे सरपंच संखे ह्यांच्या हाती देऊन फोटो सोशल मीडिया टाकून खळबळ उडवली होती.१६ ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा : त्या नंतर चिडलेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पालघरच्या ठाणे जिल्हा समाज संघ सभागृहात ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी दापोलीचे सुपुत्र वैभव संखे, जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे ह्यांच्या प्रयत्ना नंतर आमदार अमित घोडा, जिप उपाध्यक्ष सचिन पाटील, सभापती रवींद्र पागधरे, सुधीर तामोरे, परीक्षित पाटील, उपसरपंच हेमंत संखे आदींच्या उपस्थितीत दापोलीच्या सरपंच मनस्वी संखे ह्यांच्या हाताला जिल्हाध्यक्षानी शिवबंधन बांधल्याने दापोलीच्या ग्रामपंचायतींवर आता सत्ता कोणाची ह्या दावा-प्रतिदाव्याला पूर्ण विराम मिळाला आहे. तर तालुक्यातील २६ पैकी १६ ग्रामपंचायतींवर सेनेची सत्ता असल्याचा दावा केला आहे.