शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:18 IST

शेकडो उद्योगांचे उत्पादन होणार ठप्प : दीड लाख कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न

पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा बंदची करवाई केली आहे. यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील शेकडो उद्योगांच्या उत्पादनावर आणि हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.तारापूर येथील सीईटीपीतून नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्याचबरोबर अनेक त्रुटी निदर्शनास आल्यानंतर आणि अनेक वेळा सुधारण्याची संधी देऊनही फारसा फरक नसल्याने जुन्या सीईटीपीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये लघु, मध्यम व मोठे असे सर्व मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग कार्यरत असून त्यापैकी प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या जुन्या सीईटीपीमध्ये प्रक्रियेसाठी सांडपाणी पाठविणाऱ्या उद्योगांची संख्या ६०० च्या आसपास असून, एनजीटीने एमआयडीसीतील उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात ४० टक्के पाणी कपात करण्यापूर्वी या सीईटीपीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून मागील अनेक वर्षे सुमारे ४० ते ५० एमएलडी सांडपाणी येत होते. त्या अतिरिक्त येणाऱ्या सांडपाण्यावर अपेक्षित व पुरेशी प्रक्रिया न करताच ते सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे पर्यावरणाच्या झालेल्या हानीबरोबरच मच्छिमारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि मासेमारी व शेतीवर झालेल्या गंभीर परिणामामुळे अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी)कडे याचिका दाखल करून ते यशस्वीपणे लढा देत आहेत.

कारवाई का?माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

नोव्हेंबर अखेरपासून जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सुधारणा करण्यासाठी केंद्र स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आले होते. या प्रक्रिया केंद्राला जोडलेल्या सर्व उद्योगांतील शौचालय व मानवी सेवन आणि वापरासाठी लागणारे पाणी सीईटीपीत येत होते. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवला आहे, तर नवीन २५ एमएलडी क्षमतेचा सीईटीपी कार्यरत असून, या ठिकाणी ११ एमएलडी सांडपाणी सध्या येत आहे. उर्वरित उद्योगांमधील व विशेषता जुन्या सीईटीपीला जोडलेल्या उद्योगांची सांडपाण्याची लाईन नवीन सीईटीपीला जोडणी करण्यास एमआयडीसी असमर्थ ठरल्याने येथील सुमारे दोनशे-अडीचशे उद्योगांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.- डी. के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार