शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

सर आली धावून, सेंट्रिंग गेले वाहून; वाडा-भिवंडीला जोडणाऱ्या उचाट पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:12 IST

गेल्या एप्रिल महिन्यात पुलाच्या स्लॅबसाठी सेट्रींग ठोकण्यात आले होते.

वाडा : वाडा व भिवंडी तालुक्यांना जोडणारा उचाट येथील तानसा नदीवरील पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून मुदत संपून एक वर्षाहून अधिक काळावधी उलटला असतनाही पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. गेल्या एप्रिल महिन्यात पुलाच्या स्लॅबसाठी सेट्रींग ठोकण्यात आले होते. मात्र, उन्हाळ्यात स्लॅब न भरल्याने व शुक्रवारी झालेल्या पावसात नदीला पुर आल्याने सेट्रींग चे साहित्य वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वाडा व भिवंडी तालुक्यांना जोडणारा उचाट येथील तानसा नदीवरील पुलाच्या कामाला ५ एप्रिल २०१६ मध्ये मंजूरी देण्यात आली. पुल अधिक ५०० मीटर रस्ता अशा दोन्ही कामांसाठी ४ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुलाच्या कामाचा ठेका नाशिक येथील आर. के. सावंत या ठेकेदाराला देण्यात आला आहे. उभारणीसाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.ठेकेदाराने २०१६ मधील एप्रिल महिन्यात पुलाच्या कामाला सुरवात केली मात्र, नियोजित कालावधी होऊन वर्षाहून अधिक काळ उलटला तरी अद्यापही या पुलाचे ४० टक्के काम शिल्लक आहे. एप्रिल २०१९ साली पुलाचा स्लॅब टाकण्यासाठी सेट्रींगचे काम करण्यात आले होते. मात्र, स्लॅब न टाकल्याने शुक्रवारी झालेल्या पावसात नदीला पुर आल्याने सेट्रींग चे साहित्य वाहून गेले आहे. त्यातच पुलाजवळ तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरही मुरूम ऐवजी माती टाकल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या कामात दिरंगाई करणाºया ठेकेदाराला प्रति दिन एक हजार रु पये प्रमाणे दंड आकारला जातो मात्र, दंड आकारूनही ठेकेदार याकामाकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे.वाडा तालुक्यातील उचाट येथे पहिली ते बारावीपर्यंत शाळा असून या शाळेत भिवंडी तालुक्यातील म्हणजेच तानसा नदीपलीकडच्या २० ते २५ गावातील सुमारे ८०० विद्यार्थी उचाट येथे शिक्षणासाठी येत असतात. नियोजित पुलाच्या वरच्या बाजूला एक छोटा बंधारा असून या बंधाºयावरून पावसाळ्यात विद्यार्थी येत असतात. मात्र पुराच्या वेळेस या बंधाºयावरून पाणी जात असते. अशा वेळी त्यांचे शैक्षणकि नुकसान होते. तसेच, काही वर्षापूर्वी या बंधाºयाला संरक्षक कठडा नव्हता त्यामुळे येथे विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या एक दोन घटनाही येथे घडल्या आहेत.संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडे आम्ही हेलपाटे मारून कंटाळलो मात्र, त्यांना पुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पुलाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असल्याने ते पूर्ण होता होईना. आता आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही.- प्रभाकर मोरे,ज्येष्ठ ग्रामस्थ उचाटशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत पुलाचे काम पूर्ण करू न शकलेल्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.- प्रा.रमेश मोहिते, शिक्षक,उचाट शिक्षण संस्था उचाटपुलाच्या कामात दिरंगाई केल्याने संबंधित ठेकेदाराला प्रति दिन एक हजाराचा दंड आकारला जात आहे.- प्रकाश पातकर,शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार