शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी विरारमधील तरुणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:52 IST

७ एप्रिलला होणार स्पर्धा : अर्नाळा-आगाशीमधील सात खेळाडू

पारोळ : नेपाळमध्ये ७ एप्रिलला आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात विरारमधील सुपुत्रांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सात खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे सातही खेळाडू विरारमधील अर्नाळा-आगाशी येथील आहेत. त्यांची ही निवड अर्नाळा-आगाशीवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. 

अर्नाळा- आगाशी येथे सामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेल्या ह्या तरुणांना लहानपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड असून, क्रिकेटमध्ये त्यांचे उत्तम वर्चस्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या क्रिकेट संघात हे तरुण सहभागी असतात. यामुळे सिनिअर नॅशनल टेनिस क्रिकेट स्पर्धेत त्यांना  प्रथमच महाराष्ट्राच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. त्या आनुषंगाने  कन्याकुमारी येथे पार पडलेल्या सिनिअर नॅशनल टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. या संघात विरारमधील अर्नाळा  गावातील प्रशांत घरत, जयेश घरत, विघ्नेश साखलतोडे, विकास धस्कर, अमित तांडेल, राहुल नाईक तर आगाशीमधील  हितेश मेहेर या तरुणांनी उत्कृष्ट खेळ दाखवल्याने त्यांना नेपाळमधील पोखरा येथे ७ एप्रिल ते११ एप्रिल दरम्यान होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी, टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाकडून निवडपत्र देण्यात आले आहे. या तरुणांच्या उत्कृष्ट खेळामुळे संपूर्ण देशात विरारकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.