शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅटोमिक सेंटरची सुरक्षा भेदली

By admin | Updated: August 24, 2015 02:27 IST

अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या आवारात शिरून महागड्या केबलची चोरी करून पळून जाणाऱ्या चोराला रिक्षासह तारापूर पोलिसांनी

बोईसर : अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या आवारात शिरून महागड्या केबलची चोरी करून पळून जाणाऱ्या चोराला रिक्षासह तारापूर पोलिसांनी २२ आॅगस्टच्या रात्री पकडले असून एका जागृत नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून चोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याने देशाच्या अतिसंवेदनशील ऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी हेच जणू चोरांनी दाखवून दिले आहे.तारापूर येथे १६० मेगावॅटच्या दोन व ५४० मेगावॅटच्या दोन अणुभट्ट्यांबरोबरच अत्यंत महत्त्वाचे भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) असे देशाचे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांच्या आत बाहेरील सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी.आय.एस.एफ) आहे. तसेच सी.सी. कॅमेऱ्याद्वारे या महत्त्वाच्या प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा राबविली जाते. असे असतानाही चोर प्रकल्पाच्या आवारापर्यंत पोहोचलाच कसा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोराने दहा पेयर व ०.७५ मिमीची काळे प्लॅस्टिक आवरण असलेल्या ६८ व ५३ मीटर अशी एकूण १२१ मीटर लांब असलेल्या दोन पॉलीकॅब वायरचे बंडल चोरले होते. या प्रकरणात तारापूर गावातील एका आरोपीला पकडले असून त्याच्याजवळून अन्य साथीदारांची माहिती घेण्यात येऊन यामागे कुणी मोठी टोळी आहे का, याचीही तपासणी तारापूर पोलीस करीत आहेत. जून २०१५ मध्ये तारापूरच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आय.पी. प्लँटमधील गवताळ भागातून केबल चोरीच्या घटनेची पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आताच्या घटनेची तक्रार तारापूर अणुऊर्जा केंद्राकडून दाखल करण्यात आली नव्हती.