शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सलग पाच वर्षे खाडा न करणारी ययाती देशात दुसरी

By admin | Updated: April 18, 2017 06:41 IST

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने इयत्ता दुसरी ते सहावी पर्यंत सलग

अनिरुध्द पाटील, बोर्डीपालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने इयत्ता दुसरी ते सहावी पर्यंत सलग पाचही शालेय वर्षात शंभरटक्के उपस्थित राहण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे ती राष्ट्रीयस्तरावरील द्वितीय आणि राज्य स्तरावरील पहिली विद्यार्थिनी बनली आहे. तिचे पूर्व प्राथमिक शिक्षण डहाणू पारनाका येथील न्यू एज्युकेशन ट्रस्ट येथे झाले. सण २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात ती दुसरी इयत्तेत शिकताना एकही दिवस अनुपिस्थत राहिली नाही. त्यानंतर तिसरी, चौथी इयत्तेत हजेरीपटावरील तिची उपस्थिती शंभर टक्के राहिली. या तिन वर्षाच्या काळात तिने दररोज सोळा किमीचा प्रवास खाजगी वाहनातून केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात प्रवेश घेतला. तेथेही ५ वी व ६ वी इयत्तेमध्ये वर्षभर उपस्थिती कायम राखली. गतवर्षी डहाणू तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद झाली शिवाय काही दिवस पुरस्थिती होती. मात्र या वेळी वडिलांनी तिला दुचाकीवर शाळेत सोडल्याने हजर राहता आले. अभ्यासाप्रमाणेच संस्कृतिक कार्यक्र म, वक्तृत्व स्पर्धा आणि खेळात तरबेज आहे. पहाटे उठून व्यायाम, योग अभ्यास, गृहपाठ, अवांतर वाचन, टीव्ही पाहणे आणि भावंड व समवयीन मुलांशी खेळणे हा तिचा दिनक्रम आहे. जंकफूडला बगल देत घरी बनविलेले जेवण सर्वाधिक प्रिय असून तिच्या आरोग्याची गुरु किल्ली असल्याचे आई पौर्णिमा हिचे म्हणणे आहे. आई-वडील दोघांनीही बिपीएडपर्यंतचे शिक्षण घेतल्याने खेळाचा वारसा तिने जपला आहे. दरम्यान, इंटरनेटच्या माध्यमातून ‘हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन स्कूल’ या साईटला भेट दिल्यानंतर आपल्या पाल्याने नकळत एका विक्र माची नोंद केल्याचे वडील शैलेन्द्र यांच्या लक्षात आले. भोपाळच्या मानसी दास या ९ वी इयत्तेतील विद्यार्थिनीने सलग नऊ वर्ष उपस्थित राहण्याचा विक्र म केला आहे. दास ही शहरी भागातील विद्यार्थिनी आहे. तर घर ते शाळा हा खडतर प्रवास करणारी ग्रामीण भागातल्या ययाती गावड ही राष्ट्रीय पातळीवरील दुसरी आणि राज्यस्तरावरील पहिली विद्यार्थिनी बनली आहे. या बाबत लवकरच कागदपत्रांची जमवाजमव करून इंडियन रेकॉर्डसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे शैलेन्द्र गावड यांनी लोकमतला सांगितले.