शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मासेविक्रीवरून सातपाटीत वातावरण तंग

By admin | Updated: October 7, 2015 23:59 IST

सातपाटीच्या बाजारपेठेत केळवा, एडवण, डहाणू येथील मच्छीमारांचे मासे विक्रीसाठी आणले जातात. परिणामी, आपल्या माशांची विक्रीच होत नसल्याचे सांगून सातपाटीच्या काही महिलांनी

- हितेन नाईक,  पालघरसातपाटीच्या बाजारपेठेत केळवा, एडवण, डहाणू येथील मच्छीमारांचे मासे विक्रीसाठी आणले जातात. परिणामी, आपल्या माशांची विक्रीच होत नसल्याचे सांगून सातपाटीच्या काही महिलांनी बुधवारी आक्रमक होत त्यांच्या मच्छींचा टेम्पो रोखून धरीत ती उतरविण्यास मज्जाव केला. यामुळे वातावरण तंग झाले असून याबाबत सामंजस्याने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.सातपाटी हे एक प्रगतिशील मासेमारी बंदर असून ४०० ते ५०० लहान-मोठ्या नौकांद्वारे मासेमारी केली जाते. या गावातून गिलनेट पद्धतीने समुद्रातील पाण्याच्या प्रवाहासोबत जाळे सोडून मासे पकडले जात असल्याने तसेच पकडलेले मासे बर्फात ठेवले जात असल्याने गुणवत्ता व चवीबाबत सातपाटीचे मासे सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे वापी, डहाणू, विक्रमगड, वाडा, जव्हार, नाशिक, पुणे इ. भागांतून मोठ्या प्रमाणात व्यापारी मासे खरेदीसाठी येत असतात. तर, परदेशात एक्स्पोर्ट करणारे व्यापारीही सातपाटीला प्रथम प्राधान्य देत असतात.वर्षभरात ३ ते ४ महिनेच होणाऱ्या उत्पन्नावर त्यांना वर्षभराचा उदरनिर्वाह करावा लागतो. सध्या त्यांच्या बोटीत सापडलेली मच्छी विक्रीसाठी ठेवले जात असताना केळवे भागातून टेम्पो भरून मच्छीविक्रीसाठी येत असल्याने सातपाटीच्या मच्छींची विक्री होत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे डिझेलचा खर्चही सुटत नसल्याने आज महिलांनी केळवा येथील मच्छींचा टेम्पो रोखून धरला. या वेळी बाचाबाची झाल्यानंतर ग्रामपंचायत, दोन्ही सहकारी संस्थांनी यातून मार्ग काढावा, अशी मागणी महिलांनी केली. (वार्ताहर)कायद्याप्रमाणे मासेविक्री रोखू शकत नाही, परंतु दोन्ही समाजांची बैठक लावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.- विश्वास पाटील, सरपंच