शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

श्रमजीवीच्या मोर्चापुढे प्रशासन नमले

By admin | Updated: August 24, 2015 23:28 IST

श्रमजीवी संघटना, वाडा तालुका शाखेच्या वतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी वाडा पंचायत समितीच्या कार्यालयावर शेकडो श्रमजीवींनी मोर्चा काढून तालुक्यातील

वाडा : श्रमजीवी संघटना, वाडा तालुका शाखेच्या वतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी वाडा पंचायत समितीच्या कार्यालयावर शेकडो श्रमजीवींनी मोर्चा काढून तालुक्यातील आरोग्य विभागाचा निषेध केला. मोर्चेकऱ्यांनी पंचायत समितीच्या इमारतीला घेराव घालून येथील मार्ग बंद केला होता. अखेर, मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची प्रशासनाने दखल घेऊन या मागण्यांची पूर्तता केली असल्याचे लेखी पत्र आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांनी मोर्चेकऱ्यांपुढे येऊन वाचून दाखविले.मोर्चेकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गोऱ्हे येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार व इतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम तत्काळ पूर्ण करावे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राहावे, कुडूस येथे रिक्त असलेले आरोग्य अधिकाऱ्याचे पद तत्काळ भरण्यात यावे, गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही, ते त्वरित मिळावे आदी मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला दिले. या मोर्चाचे नेतृत्व पालघर जिल्हा संघटक उल्हास भानुशाली, शेतकरी जिल्हाप्रमुख जयराम बरफ, तालुकाध्यक्ष मिलिंद धुळे, तालुका संघटक सरिता जाधव यांनी केले. या वेळी मोर्चेकऱ्यांचे एक शिष्टमंडळ तहसीलदार डॉ. संदीप चव्हाण, गटविकास अधिकारी निखिल ओसवाल, वाड्याचे सहायक पोलीस अधिकारी संजय चौधरी, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता बोरीकर, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्यात बैठक होऊन या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात यावी, असे लेखी पत्र देण्याचे मान्य झाल्याने संतापलेले मोर्चेकरी शांत झाले. दरम्यान, तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडविला, असा ठपका ठेवत आरोग्य अधिकारी चव्हाण यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, ही मागणी मोर्चेकऱ्यांनी लावून धरली. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र आरोग्य अधिकाऱ्यांनी वाचून दाखविले. या वेळी तालुका उपाध्यक्षा निर्मला पाटील, सुरेश पराड, संघटक बाळाराम पाडोसा आदी उपस्थित होते. आता या मागण्या प्रत्यक्षात कधी मान्य होतात याकडे सगळ््यांचे लक्ष आहे. (वार्ताहर)