शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

संक्र ांतीचा पर्वकाळ दिवसभर, वाहन वराह, उपवाहन वृषभ

By admin | Updated: January 13, 2016 00:37 IST

दरवर्षी /मकरसंक्र ांती सणाबाबत विशेषत: स्त्रियांना उत्सुकता लागून असते. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश देणारा मकरसंक्र ांतीचा सण यावर्षी १५ जानेवारी २०१६ रोजी येत आहे.

पालघर : दरवर्षी /मकरसंक्र ांती सणाबाबत विशेषत: स्त्रियांना उत्सुकता लागून असते. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश देणारा मकरसंक्र ांतीचा सण यावर्षी १५ जानेवारी २०१६ रोजी येत आहे.मकर संक्रांतीबाबत अनेक धर्मग्रंथात वेगवेगळा उल्लेख आढळतो. तसेच संक्र ांतीबाबत शुभ-अशुभ अशा चर्चाही होतात; परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, असे पंचागांमध्ये सांगितले आहे. त्यामुळे केवळ आनंदाची देवाण-घेवाण व गोड संबंध जपण्यासाठीच हा सण साजरा केला जात आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यावर हा मकर-संक्र ांत योग येतो. यावर्षी १५ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे याच दिवशी संक्र ती आहे. परंपरेनुसार या दिवशी तिळमिश्रीत पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ होम, तीळ तर्पण, तीळभक्षण व तीळदान अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला जातो. यामुळे सर्व पापांचा क्षय होतो, असेही पंचागात सांगितले आहे. तसेच अजूनही ग्रामीण भागात संक्र ांत पाहणे सुरू आहे. संक्र ांत पाहणे म्हणजे पुरोहित किंवा धर्मशास्त्री यांच्याकडे जाऊन संक्र ांतीचा पुण्यकाल कोणता? संक्र ांत यावर्षी कशी आहे, तिचे वाहन कोणते, ती कुठून कोणत्या दिशेला जात आहे? कोणते कार्य करणे या काळात उचित आहे इत्यादी बाबी पाहतात. यावर्षी संक्र ांतीचा पुण्यकाल १५ जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. तिचे वाहन वराह असून उपवाहन बैल आहे. हिरवे वस्त्र परिधान करून ती पश्चिमेकडून पूर्वेस जात आहे.२२ डिसेंबर रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, परंतु आपल्याकडील पंचांग हे निरयन पद्धतीवर आधारित असल्याने सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केला की, आपण मकर संक्रांत साजरी करतो.यंदा गुरुवार १४ जानेवारी रोजी उत्तर रात्री १ वाजून २६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पुण्यकाळ १५ जानेवारीला आला आहे. सूर्याने एकदा निरयन मकर राशीत प्रवेश केला की, पुन्हा तो त्याच राशीत येईपर्यंत ३६५ दिवस, सहा तास, नऊ मिनिटे, दहा सेकंद एवढा कालावधी लागतो.