शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णशय्येवर

By admin | Updated: May 2, 2016 01:20 IST

येथील पंचक्रोशीत साधारणपणे २० ते २५ ग्रामीण पाड्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी असलेल्या सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णाची तपासणी करण्यास लागणारी औषधे व साहित्याची

- शुभदा सासवडे,  सफाळेयेथील पंचक्रोशीत साधारणपणे २० ते २५ ग्रामीण पाड्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी असलेल्या सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णाची तपासणी करण्यास लागणारी औषधे व साहित्याची वानवा असल्याने गोरगरीब रूग्णांना अतिरीक्त पैसे खर्चून खाजगी दवाखान्यात जावे लागते.सफाळे आरोग्य केंद्रात दररोज येणाऱ्या रूग्णांची संख्या ८० ते १०० च्या आसपास असून वेगवेगळ्या आजारांवरील रूग्ण औषधोपचारासाठी येत असतात. या संपूर्ण नागरीकांमध्ये ८० टक्के आदिवासी गोरगरीब नागरीकांचा समावेश आहे.मंगळवारी निलम पाटील नावाच्या एका महिलेचा रक्तदाब वाढल्यावर तपासणीसाठी नेले असता ते मोजण्यासाठीच पाऱ्याचे मशीनच रूग्णालयात उपलब्ध नव्हते. तर इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये सेल नव्हते. त्यामुळे त्या महिलेला तशाच अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेमुळे रूग्णालयाच्या भोंगळ कारभार उघड्यावर पडला आहे. याच प्रमाणे महिनाभरापुर्वी एका आदिवासी तरूणास सर्पदंश झाला होता. त्याला ४ दिवस रूग्णालयात दाखल करून उपचारादरम्यान गुण येत नव्हता. अशात तेथील डॉक्टरांनी वेळकाढूपणा करून त्याला पुढे नेण्याचा हस्तक्षेपानंतर त्या तरूणावर योग्य उपचार करण्यात आले.असा होतो भ्रष्टाचारअनेकदा श्वानदंश झालेल्या रूग्णांना बाहेरून अतिरीक्त पैसे खर्चून इंजेक्शन आणायला लावली जातात. तसेच दवाखान्यात मोफत औषधे असतानाही जवळच्या मेडिकलमधून औषधे आणावयास लावली जातात. या रूग्णालयात येथील डॉक्टर आदिवासी गोरगरीब रूग्णांकडून तपासणीसाठी १० ते २० रू. बिनदिक्कत मागीतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. येथील परिचारीकाही रूग्णांकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याचे व उद्धट वर्तन केले जात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.