शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय कार्यकर्त्यांची चौकशी? पोलिसांचे स्वतंत्र पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:14 IST

वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे.

वसई  - वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने महापालिकेकडून माहिती अधिकारात अर्ज केलेल्यांची माहिती मिळवली आहे.माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी शनिवारपासून वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे. खंडणी घेतल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी माहिती अधिकाराचीच सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या अर्जांची माहिती मिळवली आहे. अर्जदाराने किती आणि कोणाविरोधात माहिती मागवली. तक्रार केल्यानंतर त्यावर काय कारवाई झाली याची माहिती पोलीस घेत आहेत. यात ज्यांच्याविरोधात अर्ज दाखल झालेत त्या संबंधित बिल्डरांकडून खंडणीची मागणी केली गेली काय. यांची चौकशी होणार आहे.मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दाखवाच...मनसेचे पोलिसांना आव्हानआरटीआयखाली माहिती मागवलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून दाखवावेच, असे आव्हान मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत पत्रकार परिषदेत बोलताना पोलिसांना दिले. मनसेच्या एकाही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला तर वरती राज ठाकरे बसलेले आहेत. ते काय आहेत हे इथल्या नेत्यांना माहितीच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका, पोलीस आणि संबंधित विभागाची आहे. अनधिकृत बांधकामे होण्यापूर्वीच ती रोखली पाहिजेत. पण, यात त्यांचेही हितसंबंध गुंतलेले आहेत. कारवाई का नाही केली. यासाठी अनधिकृत बांधकाम झालेल्या विभागातील महापालिका अधिकारी आणि पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या मालमत्तेचेही चौकशी झाली पाहिजे अशी मनसेची प्रमुख मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताVasai Virarवसई विरार