शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

वृद्धेला मारहाण करून दागिन्यांची लूट

By admin | Updated: August 24, 2015 23:27 IST

पालघर-माहीम रोडवरील एका फलॅटमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत रविवारी दुपारी ३ वा. एका अज्ञात चोरट्याने तिला मारहाण करीत

पालघर : पालघर-माहीम रोडवरील एका फलॅटमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत रविवारी दुपारी ३ वा. एका अज्ञात चोरट्याने तिला मारहाण करीत तिच्या अंगावरील सुमारे ७५ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. पालघर जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन अधीक्षकपदी कार्यरत असलेले दीनानाथ पाटील हे आपली आई, पत्नी व मुलासह पालघर-माहीम रोडवरील कंचनपुष्प रहिवासी संकुलमध्ये राहतात. शनिवारी ते रत्नागिरी येथे मेकॅनिकल इंजिनीअरच्या शिक्षणासाठी राहत असलेल्या सौरभला भेटण्यासाठी गेले होते, तर त्यांची पत्नी दीप्ती ही माहेरी सफाळे येथे गेली होती. दुपारी त्यांचा मुलगा भाविक व अन्य तीन लहान मुली खेळण्यासाठी इमारतीखाली गेल्या होत्या. दुपारी ३ वा.च्या सुमारास दरवाजात उभ्या असलेल्या चोरट्याने आपण महावितरणकडून आलो असून इलेक्ट्रीक बिल द्यायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे लक्ष्मी पाटील (७५) यांनी दरवाजा उघडताच त्या अज्ञात चोरट्याने त्या वृद्ध महिलेला जोरात ढकलून देत त्यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांना जखमी केले. कपाटाच्या चाव्यांची मागणी करून त्याने सर्व कपाट तपासले. मात्र, हाती काहीही लागले नाही. शेवटी, त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ व हातांतील सोन्याच्या बांगड्या हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस यांनी घटनास्थळी भेट दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)