शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस आदिवासी जमीन खरेदी -विक्रीचा अहवाल आज येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:13 IST

गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र गाजत असलेल्या मोखाड्यातील आदिवासींच्या बोगस जमीन खरेदी विक्री घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे.

रवींद्र साळवे मोखाडा : गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र गाजत असलेल्या मोखाड्यातील आदिवासींच्या बोगस जमीन खरेदी विक्री घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. लोकमत ने सातत्याने पाठपुरावा करून हा घोटाळा उघडकीस आणला होता.यामुळे वर्षानुवर्षे दडवलेले हे प्रकरण लोकमतने खोदून बाहेर काढल्याने या भूमाफिया व दलाल तसेच महसूल विभागाचे भ्रष्ट अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेतसन २००९ मध्ये लक्ष्मीबाई पहाडी यांच्या नावे असलेली ४७८ गट क्रमांकातील १० हेक्टर ८५ मधील २९ एकर जमीन नाशिकचे बिल्डर गिरीष खुशालचंद्र पोद्दार व इतर १३ बिगर आदिवासी बिल्डरांनी दस्तखत क्रमांक १४५-२००९ ने बोगसरित्या खरेदी खरेदी केली.अत्यल्प दरात घेतलेली ही जमीन पोद्दार यांनी पुन्हा २०१७ मध्ये १६/२०१७ खरेदी खताद्वारे ६ जून २०१७ रोजी परभणीच्या एका आमदाराचे पीए असलेल्या नानासाहेब येवले यांना करोडो रूपयांना विकली.परंतु महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ नुसार आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना खरेदी करता येत नाही व शासनाच्या परवानगीची असलेली लांबलचक प्रक्रिया पार पाडणे शक्य होत नसल्याने महसूल विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून या जमिनीच्या सातबाºयाच्या उताºयावरील आदिवासी जमीन हा शिक्काच गायब करून व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून आदिवासींच्या या जमिनीच्या खरेदी विक्रीचा एकदा नव्हे तर दोनदा बोगस व्यवहार भूमाफिया व दलालांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांशी संगनमत करून केला आहे.विशेष म्हणजे उपनिबंधकानेहीआम्ही कागदपत्रांची सत्यता पडताळून पहात नाही तर महसूलाला महत्वदेतो अशी अजब भूमिकालोकमतशी बोलताना घेतलीआहे.लोकमतच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकरण समोर आले असून सोमवारी सादर होणाºया अहवालातून महसूल विभागाचे अधिकारी व भूमाफिया, दलाल यांनी हा कशा प्रकार हा घोटाळा केला व त्यात कुणाकुणाचे हात माखलेले आहेत. हे सारे उघड होणार आहे.