शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वीस काढले : बीएआरसीच्या कंत्राटी कामगारांचे कामबंद

By admin | Updated: August 24, 2015 23:29 IST

तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (बी.ए.आर.सी.) ए.एस.एफ.एस.एफ या प्लांट उभारणीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या घिवली गावातील वीस कामगारांना कामावरून

बोईसर : तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (बी.ए.आर.सी.) ए.एस.एफ.एस.एफ या प्लांट उभारणीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या घिवली गावातील वीस कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून गावातील एकूण सत्तर कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. येत्या दहा दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास घिवली गावाच्या वतीने बीएआरसी तसेच तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन आणि तीन व चार या सर्व प्रकल्पांतील कामगारांचा मार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.मागील चार महिन्यांपासून या वीस कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात एल अ‍ॅण्ड टी च्या व्यवस्थापनाशी अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या. परंतु, काहीही ठोस मार्ग न निघाल्याने घिवलीच्या कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. कामगारांच्या या आंदोलनाला घिवलीच्या ग्रामस्थांनीही पाठिंबा देऊन एल अ‍ॅण्ड टी साठी सुरू असलेल्या गावातील दोन जीपगाड्या व एक बसही या बंदमध्ये सहभागी झाल्याने एल अ‍ॅण्ड टी च्या सुमारे चारशे परप्रांतीय कामगारांना आज कामावर जाता आले नसल्याचे घिवलीचे शिवसेना शाखाप्रमुख शैलेश मोरे यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून घिवली गावचे सरपंच भुवनेश्वर हिलीम, उपसरपंच सुनील प्रभू, सेना नेते प्रभाकर राऊळ, मनोज संखे, सुधीर तामोरे, संतोष मोरे, देवानंद मेहेर, संजय तामोरे, राजू कुटे, भुवनेश्वर पागधरे, जि.प. सदस्य तुळशीदास तामोरे यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट दिली. (वार्ताहर)चारशे परप्रांतीयांना घेतले कामावरबीएआरसीमधील एएसएफएसएफ या प्लांटच्या उभारणीचे काम एल अ‍ॅण्ट टी ही कंपनी करीत असून त्या कामाकरिता घिवली गावातील सत्तर कामगारांना कामावर घेतले होते. परंतु, ६ एप्रिल २०१५ पासून सत्तरपैकी वीस कामगारांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्यात येऊन सुमारे चारशे परप्रांतीय कामगार कामावर घेण्यात आल्याचे घिवलीच्या सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.