शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भरतीमध्ये ‘भारांकन’ नकोच!

By admin | Updated: March 30, 2017 05:17 IST

राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी

विक्र मगड : राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी . जर ती भारांकन पद्धतीनेच करावयाची असल्यास दहावीचे गुण गृहित न धरता कृषी पदविकेनुसार ती भरावी असे निवेदन कोकण विभाग पत्रकार संघ आणि युवा स्पर्श संस्था यांच्याकडून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.कृषीसेवक भरतीमधे गैरप्रकार झाल्याने ती रद्द करून पुन्हा नव्याने भरांकन भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र, ही भरती परीक्षेच्या माध्यमांतून न घेता १० वी आणि कृषी पदवी किंवा पदविकेचे गुण भरांकन पद्धतीने धरून केली जाणार आहे. मात्र १० वीला गुण देण्याची पद्धत वारंवार बदलत गेली आहे. पहिल्यांदा सरळ गुण देण्याची पद्धत होती. त्यानंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होऊ लागली आणि सध्या बेस्ट आॅफ ५ चालू असल्याने अनेक परिक्षार्थींच्या गुणांमध्ये तफावत आहे. या संदर्भातील आपल्या मागण्यांसह हर्षद पाटिल, सचिन भोईर, अमोल सांबरे व कृषी सेवक यांनी निवेदन सादर केले. हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आता त्याबाबत वरीष्ठ कोणती भूमिका घेतात याकडे सर्व परिक्षार्थींचे लक्ष लागले आहे. या नव्या वादामुळे आधीच रखडलेली भरतीची प्रक्रिया आणखी काही महिने रखडणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेली बेरोजगारी आणखी लांबणार आहे.(वार्ताहर)या आधीची भरती रद्द करु न भारांकन पद्धतीने यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी दहावीचे गुण गृहीत धरले जाणार आहे. २०१० पासून बेस्ट आॅफ फाईव्ह लागू असल्याने त्या आधीच्या विद्यार्थ्यांचे कृषी सेवक होण्याचे स्वप्न भंगणार आहे. - मनीष पाटील, कृषी पदविकाधारककृषी सेवक हा शेतीवर आधारीत योजनांचे कामकाज पाहत असतो. १० वी ला शेतीवर निगडित अभ्यासक्र म नसल्याने भारांकन पद्धतीने कृषी सेवक पदाची निवड करातांना केवळ कृषी पदविका, पदवी चे गुण गृहीत धरावे.- राहुल पाटीलकृषी पदविकाधारककाय आहेत मागण्याकृषी सेवक पदांसाठी लागणारी पदविका आता तांत्रिक केल्याने ही या पदवीसाठी बारावीच्या परिक्षेच्या गुणांनुसार प्रवेश मिळत आहे. त्यामुळे या भरतीसाठी १० वी चे भरांकन गुण ग्राहय धरण्यात येऊ नयेत.कृषी सेवक पदासमान असणाऱ्या ग्रामसेवक पदासाठी बारावीच्या ६० टक्के गुणांची पात्रता ग्राहय धरली जाते. या पद्धतीत दहावीचे गुण ग्राहय धरु नयेत व कृषी पदवीचे/पदवीकेचे गुण ग्राहय धरण्यात यावे.जुने विदयार्थी दहावीला कमी गुण व कृषी पदविकेला जादा गुण मिळवणारे देखील आहेत. त्यामुळे दहावीचे गुण ग्राहय धरल्यास अशा उमेदवारांचे नुकसान होईल.