शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवेला पुन्हा ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:02 IST

ठेकेदाराने आश्वासन पाळले नाही : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, नागरिकांचे हाल

विरार/नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ठेकेदाराने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटेपासून अचानक बंद पुकारला. कर्मचाºयांनी सर्व बसेस बंद ठेवल्याने एकही बस वसई तालुक्यात रस्त्यावर धावली नाही. यामुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.७०० परिवहन कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यंतरी मकरसंक्रांतीच्या दिवशी अचानक कामबंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान परिवहन ठेकेदाराने बससेवा चालविण्यासही असमर्थता दाखवली होती. त्या वेळी चौथ्या दिवशी महानगरपालिकेने मध्यस्थी करत ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यात चर्चा करून यावर तोडगा काढला होता. यानुसार मागील काही महिन्यांपासून वेळेवर होत नसलेले पगार दर महिन्याच्या १० तारखेला होतील. रखडलेले पगार तातडीने केले जातील. दर सहा महिन्यांनी ५०० रुपये वेतनवाढ देण्याचे ठरले. त्याचप्रमाणे पीएफचे पैसे व कर्मचारी सोसायटीत कामगारांचे पैसे वर्ग करण्याचे आश्वासन पालिका आणि ठेकेदाराकडून देण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने वचनपूर्ती न केल्याने कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी पुन्हा अचानक काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. महामार्गाकडे जाणाºया नागरिकांना तसेच ऐन परीक्षेचे कालावधीत विद्यार्थ्यांना शाळाही गाठता आल्या नाहीत. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आंदोलनामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.दरम्यान, या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाºयांशी बोलणी सुरू असून लवकरच तोडगा निघेल, असे परिवहन ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी सांगितले.परिवहन विभागातील मनसेच्या संघटनेने स्टंटबाजी करत हा संप पुकारला आहे. १० तारीख कालच झाली असून एक दिवस पगार न झाल्याने हे संपाचे हत्यार उगारले आहे.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई-विरार महानगरपालिकागेल्या वेळी संप केल्यावर तीन दिवसांनी मध्यस्थी करून मागण्या मान्य करण्याचे लेखी कबूल केले होते, पण १० तारीख उलटूनही कामगारांच्या खात्यावर पगार अद्याप आला नसल्याने आज आंदोलन पुकारले आहे.- विश्राम मोंढे, कार्याध्यक्ष, मनसे, महानगरपालिका कर्मचारी सेना.